महाराष्ट्र दुय्यम सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा जिल्ह्यातील 27 उपकेंद्रावर;7704 परीक्षार्थी*

 *महाराष्ट्र दुय्यम सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा जिल्ह्यातील 27 उपकेंद्रावर;7704 परीक्षार्थी*



दि 1 - उस्मानाबाद -



महाराष्ट्र दुय्यम सेवा अंतर्गत अराजपत्रित गट ‘ब’ ची पूर्व परीक्षा 2020 ही येत्या 4 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 12:00 यावेळेत एका सत्रात होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ही परीक्षा 27 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 7 हजार 704 परीक्षार्थी असणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली आहे.



उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, पार्ट-A 240 परीक्षार्थी असणार आहेत.



परीक्षा केंद्रावर येताना उमेदवारांना त्यांचे प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा पुरावा आणि त्याची छायांकित प्रत तसेच काळ्या शाईचा बॉल पेन इतकेच साहित्य घेऊन परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिला जाईल. याव्यतिरीक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही. या परीक्षेचे कामकाज करत असताना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाकडून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तसेच स्थानिक प्राधिकरणांकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सूचना, आदेश यांचे संबंधित परीक्षार्थींनी तसेच नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सेवा पुरवठादार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आणि परीक्षार्थींसाठी Basic Covid Kits, Extra Protective Kits आणि Personal Protective equipment Kits तसेच Extra 2 आणि 5 मिली सॅनिटायझर पाऊच चा पुरवठा करण्यात आला आहे.


 

या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 27 उपकेंद्र परिसरामध्ये दि. 04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 07:00 ते सायंकाळी 07:00 या कालावधीत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे या उपकेंद्राच्या 100 मी. परिसरामधील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदी माध्यमे बंद राहतील. तसेच उपकेंद्रावर परीक्षार्थी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या व्यतीरिक्त इतर कोणासही ( परीक्षार्थींचे नातेवाईक यांनाही ) प्रवेश असणार नाही. या परीक्षा उपकेंद्र परिसरामध्ये मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तेंव्हा परीक्षार्थींना कुठलीही भिती न बाळगता ही परीक्षा देण्याचे आवाहन श्री. स्वामी यांनी केले आहे.



*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या