मातोळा येथे रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण(60 लक्ष) व शुभारंभ, वृक्षारोपण आणि संजय गांधी निराधार योजना जनजागृती व सुसंवाद बैठक संपन्न.
औसा प्रतिनिधी विलास तपासे रस्त्याच्या विकास कामाचे लोकार्पण(60 लक्ष)व शुभारंभ लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष .श्रीशैल उटगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
________________________________________
आता शंभर रुपये खर्चात निराधार पगार घरपोच करणार बबन भोसले
वारंवार औसा तहसील मध्ये दलालांचा सुळसुळाट होता निराधार समितीवर माझी निवड झाल्यापासून प्रतेक गावांत जाऊन निराधार पगारिसाठी शिबीर लाऊन अनेक गावांत फॉर्म भरण्यात आले. आता आपण प्रत्येक गावामधे महा ई सेवा केंद्रामार्फत शंभर रुपये ऑनलाईनचे घेऊन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. आतापर्यंत 2600 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला आहे. प्रतेक गावांत जाऊन वंचित असणार्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
________________________________________
येत्या पाडव्याला मारुती महाराजाची गळीत हंगाम सुरू होणार श्रीशल उटगे
गेल्या सात वर्षांपासून मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बंद होता आपण मांजरा परिवारावर विश्वास ठेऊन सर्व उमेदवारांना निवडून दिले मारुती महाराज सहकारी कारखाना पाढव्याच्या शुभ मुहूर्तावर आपला गळीत हंगाम सुरू करणार आहोत. मांजरा कारखाना प्रमाणेच भाव उसाला देणार आहे तरी सर्व सभासदानी आपल्या परिसराच्या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे. कारखाना सुरू झाल्यामुळे आपल्या परिसरातील उद्योगाला चालना मिळणार आहे तसेच शेतकर्यांचा ही फायदा होणार आहे. मजुरांना काम मिळणार आहे.
________________________________________
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आण्णासाहेब भोसले(तंटामुक्ती अध्यक्ष मातोळा)यांची उपस्थिती होती. त्यावेळी बबन भोसले (अध्यक्ष,औसा तालुका संजय गांधी निराधार योजना),प्रवीण पाटील(अध्यक्ष,लातूर तालुका संजय गांधी निराधार योजना), दत्तोपंत सूर्यवंशी(तालुकाध्यक्ष औसा तालुका), शाम(बापू) भोसले(व्हा.चेअरमन मारोती महाराज साखर कारखाना), राजेंद्र भोसले (सभापती कृ. उ.बा.स.औसा), सुधीर पोतदार काँग्रेस पक्षनिरीक्षक औसा तालुका रवि पाटील विलास राव देशमुख युवा मंच तालुकाध्यक्ष औसा बालाजी सूर्यवंशी (सरपंच, मातोळा) , अमित माने, सचिन दाताळ, प्रवीण कोपरकर,त्रिवेणी काळे(पंचायत समिती सदस्य, मातोळा) ,नरेंद्र पाटील,राजेंद्र मोरे,इंद्रजीत घोडके,संजय पवार,राजेंद्र गुंड,खंडू कोराळे,धनू भोसले,अजित भोसले,मुकुंद दारफळकर,यशवंत भोसले,दिलीप मोरे,राहुल कांबळे,दयानंद गायकवाड, नेताजी जगताप,शेखर भोसले,दत्ता ननवरे,शेषेराव गायकवाड, संजय भोसले,अशोक गोरे,राणा भोसले,निशांत भोसले,नितीन जाधव,दगडू बरडे,याकूब मासुळदार,महादेव भोसले,सयाजी दारफळकर,रणजित सूर्यवंशी, सचिन जटनुरे,शरद चंदनशिवे,ढोबरे (तलाठी),होनमाणे (ग्रामसेवक) समस्त मातोळा ग्रामस्थांनच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष आनंदगावकर यांनी मांडले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.