नागरसोगा येथे ४० वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारी पणाला कंटाळल्याने विष पिऊन आत्महत्या
औसा - प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील शेतकरी लालगिर माधवगिर गिरी (४०) या शेतकऱ्यांने शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध पिले होते. त्याने विष पिल्या नंतर शेजारी व घरच्या मंडळीनी त्यांना तात्काळ उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सहा दिवस उपचारा नंतर हि त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही.बुधवारी राञी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करुन नागरसोगा येथील स्मशानभुमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि नागरसोगा येथील लालगिर माधवगिर गिरी हे अल्पभूधारक शेतकरी त्यांना १ हेक्टर ५३ आर जमीन आहे. अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होते. आठ दहा वर्षापासून ते पुणे येथे खाजगी गाडीवर चालक होते. पण कोरोना लाँकडाऊन नंतर ते गावात येऊन राहिले होते. त्यांच्यावर बँन्केचे दोन लाख तर खाजगी एक ते दिड लाख असे साडेतीन ते चार लाख रुपये कर्ज झाले होते. हे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी १० सप्टेबर रोजी विष पिले होते. सहा दिवस उपचार झाले.पण त्यातून हि ते बचावले नाहीत बुधवारी राञी ऊशीरा त्यांची प्राणज्योत मालवली.
लातूर जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले.तर नागरसोगा येथे दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. त्याच्या निधनाने नागरसोगा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.