आयुष्य किती जगले, यापेक्षा ते कसे जगले याला महत्त्व हभप गहिनीनाथ महाराज

 आयुष्य किती जगले, यापेक्षा ते कसे जगले याला महत्त्व

हभप गहिनीनाथ महाराज




आलमला येथे २३० जणांची मोफत आरोग्य तपासणी




आलमला ः सचेतन असलेल्या जीवसृष्टीसाठी नियम असतो, त्यात मृत्यू हा एक नियम असून तो सदैव सोबत करतो, मात्र आयुष्य किती काळ जगले यापेक्षा ते कसे जगले, याला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन औसा नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

औसा तालुक्यातील आलमला येथे काँग्रेसचे दिवंगत नेते अॕड. एस.एस. पाटील, चद्रकांत कापसे व चंद्रशेखरप्पा हुरदळे यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त दिशा प्रतिष्ठान व आलमला ग्रामस्थ आणि कापसे परिवाराच्यावतीने रविवारी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलमला सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ बिराजदार तर व्यासपीठावर विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॕड. उमेश पाटील, सरपंच कैलास निलंगेकर, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, प्रभाकर लोहारे, सचिव इसरार सगरे, डाॕ. अरविंद भातांब्रे, डाॕ. हनुमंत किनीकर, डाॕ. पद्मसिंह बिराजदार, डाॕ. सुनीता पाटील, जयशंकर हुरदळे, बसवेश्वर धाराशिवे, कल्याण हुरदळे, अॕड. महिशंकर धाराशिवे, पुण्यनगरीचे वृत्तसंपादक महादेव कुंभार, प्रभाकर कापसे, महादेव खिचडे, उपसरपंच खंडेराव कोकाटे, शामभाऊ कुलकर्णी, किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात २३० जणांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. यावेळी अॕड. उमेश पाटील, प्रभाकर कापसे व जयशंकर हुरदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बसवेश्वर धाराशिवे यांनी केले, तर सूत्रसंचलन पी. सी. पाटील यांनी करुन आभार मानले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या