बेलकुंड येथे चोराचा धुमाकुळ भादाचे स पो नी विलास नवले यांनी घेतली ग्रामपंचायत मध्ये बैठक
औसा प्रतिनिधी विलास तपासे
गेल्या पाच दिवसांपासून बेलकुंड गावामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज बेलकुंड येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली त्यावेळी बोलताना नवले म्हणाले की चोरी रोखण्यासाठी आम्ही राऊंड मारणार आहे तरुणांची फौज तयार करुन रात्री च्या वेळी गावामध्ये गस्त घालावी ग्रामपंचायत ने गावामधे ग्रामपंचायत निधितून चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे तसेच गावामध्ये सार्वजनिक गणपती बसवू नये आपआपल्या घरामध्ये गणेश मुर्ती ची पुजा करुन घ्यावी चौकामध्ये गर्दी करू नये कुठल्याही प्रकारचे सार्वजनिक सण साजरा करु नये असे आवाहन नवले केले त्यावेळी सरपंच विष्णु कोळी उपसरपंच सचिन पवार तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, बेलकुंड चौकीचे बिट आमलदार कमल शेख, डोलारे व सुर्यवंशी उपस्थित होते
बेलकुंड (ता. औसा) येथील शेषेराव शिरपूरे व रावसाहेब माने यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करित शिरपूरे यांच्या घरातील दोन कपाटातील साहित्य व माने यांच्या घरातील डबे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. घरातील व्यक्ती जागे झाल्याने व हाताला काहीही न लागल्याने चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. गुरूवारी (ता. नऊ) मध्यरात्री एक ते दोनच्या वाजेदरम्यान ह्या घटना घडल्या आहेत. अवघ्या पाच दिवसात गावात चोरीची ही दुसरी घटना घडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या पाच दिवसांपुर्वी गावातील शहाजी वाघमारे यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तेडून घरातील २२ हजाराची ३२ इंची एलईडी टिव्ही व इतर एक हजार ३०० चे साहित्य तर भिमराव शिंदे यांच्या शेतातील कोट्यातून दोन उडीदाची कंटे चोरी गेले होते. व त्याच रात्री संतोष झांबरे याची म्हैस चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.
अवघे पाच दिवस उलटून गेली असताच दुसर्यांदा गावातील शेषेराव शिरपूरे यांच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश करत घरातील दोन कपाटातील साहित्य उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. घरातील व्यक्ती उठल्याने चोरट्यांनी पळ काढला. तर रावसाहेब माने यांच्याही घरात प्रवेश करून घरातील साहित्य उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी भादा पोलिस प्रशासनाने मध्यरात्री गावात गस्त घालने आवश्यक आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.