डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन / बिसरा मुंडा
कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
लातूर,दि.15(जिमाका): राज्यातील अनु.जाती, व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना शेती अर्थसहाय्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन 2021-22 साठी राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवर स्वीकारण्यात येत आहेत.गरजूंनी नजीकच्या सामुदाईक सेवा केंद्र,महा ई सेवा केंद्र,ग्रामपंचायत कार्यालयातून अर्ज करावेत. या योजनेत अंतर्भूत घटक नवीन विहीर,जुनी विहीर दुरुस्ती,शेततळयाचे अस्तरीकरण तसेच इतर बाबीमध्ये वीज जोडणी आकार,सूक्ष्म सिंचन संच,ठिबक सिंचन,तुषार सिंचन परसबाग,पंपसंच (डीझेल / विद्युत), PVC / HDPE पाईप अशा विविध गरज असलेल्या बाबी निवडून अर्ज करावा.
अर्ज करताना 7/12, 8 अ ,बँक पासबुक,आधार कार्ड व मोबाईल सह उपस्थित राहून अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर शासनाच्या पोर्टल वरुन लॉटरीमध्ये आपली निवड झाल्यानंतर आपणास कागदपत्रे दिलेल्या मुदतीत अपलेाड करावे लागतील. लाभार्थीच्या अटी व शर्ती मध्ये उत्पन्न 1.5 लाखापर्यंत कमीत कमी क्षेत्र 0.4 हे. व जास्तीत जास्त 6 हे. मर्यादा, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर बाबीसाठी कमीतकमी 0.20 हे. क्षेत्र असणे नितांत गरजेचे आहे.
शोषित, अंशत : शोषित, अतिशोषित गावात नवीन विहिरीचा लाभ मंजूर होणार नाही. रेणापूर तालुक्यतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन पंचायत समिती रेणापूरचे सभापती रमेश सोनवणे,उपसभापती अनंत चव्हाण,गट विकास अधिकारी मोहन अभंगे,कृषि अधिकारी ए.के. डमाळे व विस्तार अधिकारी कृषि एस.एन.नरहरे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.