विमा कंपनी शेतकऱ्यांना फसवयाला निघाली आहे:माजी खासदार राजू शेट्टी

 विमा कंपनी शेतकऱ्यांना फसवयाला निघाली आहे

राज्य व केंद्र सरकार व्यापारयाचे व नोकरदाराचे लागे बांधे आहेत माजी खासदार राजू शेट्टी










औसा प्रतिनिधी विलास तपासे 

मराठवाड्याचे शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्या प्रमाणे आंदोलन करतील तेव्हां च उसाला व सोयाबीन ला भाव मिळेल. ह्या परिस्थितीत बदल करायचे असेल तर कोल्हापूरच्या लोकासरके पायातील पायतान हातात घेतले पाहिजे तरच बदल होईल. तुमच्यासाठी जीव धोक्यात घालून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे.

मराठवायातील शेतकऱ्यांनी मी लढण्यासाठी तयार आहे पण तुम्ही पाठीमागे असले पाहिजे. असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार  राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. मातोळा ता. औसा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर एफ आर पी चा आराधना शक्तीपिठाची या मेळाव्यात दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी ते बोलत होते यावेळी मंचावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, अमोल हिप्परगे ,प्राध्यापक प्रकाश कोफळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, हनुमंत राजे गोरे पाटील, रवींद्र इंगळे, किसनराव कदम, रावसाहेब पाटील ,धर्मराज पाटील, बालाजी शिंदे ,राजू कसबे, एडवोकेट सचिन ढवण, कृषीभूषण धनंजय भोसले ,अमोल हिप्परगे, शिवाजी भोसले,  बाबुराव पाटील  दत्ता

 आनंदगावकर दगडू बरडे माजी सरपंच शेषराव गायकवाड आदी उपस्थित होते.

     त्यावेळी राजु शेट्टी पुढे म्हणाले की, शासनाला आंदोलनाचे भीती वाटते, शेतकरी एकजूट होऊ देत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्याला फसवण्यासाठी सोकावलेल्या आहेत. अनेक भागात पिकाची कापणी न करताच रिपोर्ट देतात. उंबरठ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न निघाल्यामुळे पिक विमा नाकारला . अनेक ठिकाणी खोटी रिपोर्ट बनवून त्यामध्ये तलाठी, कृषी अधिकारी सामील करून खोटे पंचनामे करतात. असे कारस्थान विमा कंपन्या करत आहेत. ह्या  चोरीच्या धंद्यामध्ये कोणा कोणाचा हिस्सा आहे हे आपण शेतकऱ्यांनी  तपासले पाहिजे. सोयाबीनला 11हजार रुपये भाव मिळत होता शेतकरी खुशीत होते, आज तोच भाव चार हजार रुपये दराने बाजारात आहे .  जेव्हा शेतकर्या जवळ सोयाबीन नसेल तेव्हा भाव वाढणार आहेत आणि व्यापाराचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने 1200000 टन सोयाबीनची पेंड आयात केली.

           जे व्हायचे तेच झाले धडाधड सोयाबीनचे भाव खाली आले, आज चार हजार रुपये पर्यंत सोयाबीनचे दर आले मी म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांना नका मदत करू , पण बाजारातून मिळणारा दर तरी त्याला घेऊन द्या . हे सरकार नेमका कुणासाठी काम करत आहे दलालासाठी, व्यापारयासाठी का काबाडकष्ट करून देशाला अन्नधान्य  देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हेच कळत नाही. गोरगरिबांना खाद्य तेलाचे भाव कमी करतो असे सांगून मोदी सरकारने सोयाबीन आयात केली. पण तेलाचे भाव कमी झाले का नाही उलट वाढले . असे मोदी सरकार शेतकऱ्यांना नेहमीच  फसवत आहे. तुकड्यांनी एफ आर पी द्या अशी मागणी कारखानदारांची आहे हे धोरण मात्र केंद्र सरकार राबवत आहे आणि त्याला पाठिंबा राज्य सरकारचा आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय टोळीयुद्ध चालू आहे . एका बाजूला केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महा विकास आघाडी यांच्यात यद्ध चालू आहे एकदा  केंद्रीय मंत्र्याला अटक करायचे मग केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या  नातेवाईकावर धाडी टाकायच्या  असे  राजकीय टोळी युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये माझा शेतकरी भरडला जातोय हे तुम्ही लक्षात ठेवा. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे  मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीमागे रहावे असे आवाहन  माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या