लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या
अध्यक्षपदी रामदास भोसले यांची निव
लातूर : लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रामदास भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष स्व. बोधकुमार चापसी यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे असो.चे सहसचिव स्व. हरिश्चंद्र बलशेटवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सहसचिवपदी उदगीर येथील ज्येष्ठ केमिस्ट सत्यवान बोरोळकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेले रामदास भोसले हे मागच्या २५ वर्षांपासून संघटनेत सक्रिय कार्य करीत आहेत. त्यांनी मराठवाडा केमिस्ट असो.च्या सचिवपदाचीही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे. श्री महादेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. लातूर व्यापारी महासंघावरही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. मागच्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या काळातही त्यांनी संघटनेच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. लातूर जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाभरातून तसेच राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
--------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.