दुसर्‍यांदा लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण झालेले निलेश गायकवाड यांचा चर्मकार समाजातर्फे सत्कार

 दुसर्‍यांदा लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण झालेले निलेश गायकवाड यांचा चर्मकार समाजातर्फे सत्कार







लातूर,दि.४ःकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दुसर्‍यांदा यश मिळवून लातूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणारे डॉ. श्रीकांत गायकवाड यांचे सुपूत्र निलेश गायकवाड यांचा लातूर चर्मकार  समाजाच्या वतीने सी.के.मुरळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.यावेळी निलेश गायकवाड यांचे आई-वडील प्राध्यापक श्रीकांत गायकवाड, अनिता गायकवाड व लहान भाऊ यांचाही शाल,बुके,फेटा देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सी.के.मुरळीकर यांची निलेश गायकवाड यांची समाजासाठी प्रेरणादायी वाटचाल सुरू असून,त्यांनी संवेदनशीलपणे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ.आर.डी.निटुरकर, प्राध्यापक हलगरकर, शिवसेना नेते तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष - सी.के.मुरळीकर, माजी जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य - अनिल कबाडे, माजी शहराध्यक्ष - रवि कुरील, शिवाजी दामावले, मधुकर शेवाळकर, बालाजी साबळे, माजी शिक्षक जिल्हाध्यक्ष - धर्माजी ऊदबाळे, शिवसेना युवा - चंद्रकांत कांबळे, शशीकांत नाबदे,शुभम गुजर, सुनील ढवळे.ईत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या