कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी
प्रत्येकाने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करुन घ्यावे
--- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
§ ‘ मिशन कवचकुंडल’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत पहिला व दुसरा डोस -49 हजार 504 नागरिकांचे लसीकरण
§ उवरित दि. 12 ते 14 ऑक्टोबर, 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा.
§ मिशन कवच कुंडल मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण सुरु
लातूर दि.12 (जिमाका):- कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आवाहन केले आहे.
राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार लातुर जिल्ह्यामध्ये मिशन कवच कुंडल ही मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सर्व विभागप्रमुख आयएमए, व्हीएसटीएस यांची बैठक घेऊन सर्व विभागांना सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले आहे.
ही मोहिम दि. 8 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मिशन कुंडल कवच मोहिम जिल्हयात राबविण्यात येत आहे. या कालावधीतील म्हणजेच दि.8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आरोग्य विभागामार्फत जिल्हयामध्ये पहिला व दुसऱा डोस नागरीकांना एकूण 49 हजार 504 नागरीकांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात दिनांक 8 ते 14 ऑक्टोबर 2021 पहिला व दुसरा डोस- - 6 हजार 645, तर लातूर महानगर पालिकातंर्गत पहिला व दुसरा डोस- 8 हजार 397 इतके लसीकरण झाले आहे.
लातूर जिल्ह्यात 244 केंद्रावर लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून या सत्रामध्ये 49 हजार 504 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरणाची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा डोस - 329 ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पहिला व दुसरा डोस - 322, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे पहिला व दुसरा डोस - 182 , ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस - 255 , पहिला व दुसरा डोस-401, ग्रामीण रुग्णालय बाभळगांव येथे पहिला व दुसरा डोस-401, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा डोस-366, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी येथे पहिला व दुसरा डोस-133, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा डोस- 233, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे पहिला व दुसरा डोस-641, ग्रामीण रुग्णालय औसा येथे पहिला व दुसरा डोस-670 इतके लसीकरण झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस-435 उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पहिला व दुसरा डोस-2 हजार 678 इतके लसीकरण झाले आहे.
000
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.