दिलीप बिल्डकॉन व NHAI चे अधिकारी यांच्यात NH-361 मुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व आशिव,उजनी,चिंचोली येथील लोकांच्या अडचणीबाबत मा.आमदार दिनकरराव माने व खा.ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न.
औसा-(दि.04 ऑक्टोबर )आशिव येथील हॉटेल कन्हैया येथे औसा तालुक्याचे मा.आमदार दिनकरराव माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली व खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप बिल्डकॉन व NHAI चे अधिकारी यांच्यात NH-361 मुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व आशिव,उजनी,चिंचोली येथील लोकांच्या अडचणीबाबत महत्वपूर्ण व सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व मा.आमदार दिनकरराव माने साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ज्या ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्या ठिकाणची पाहणी केली त्यामध्ये आशिव येथे ब्रिज व तसेच उजनी येथील पुलाची उंची वाढवणे बाबत निर्णय झाला व चिंचोली येथील शेतकऱ्यांचा शेतात जाणारे पाणी कश्या प्रकारे अडवले जाऊ शकते अश्या अनेक प्रश्नावर उपायजोजना करण्याबाबत निर्णय झाला.
यावेळी शेतकऱ्याच्या सर्व समस्या सोडवल्याबद्दल सर्वांनी मा.आमदार दिनकरराव माने साहेब व खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार व्यक्त केले व ह्याच श्रेय माने साहेबांना दिलं गेलं.
यावेळी उजणीचे सरपंच युवराज गायकवाड,उपसरपंच योगीराज काका पाटील,श्रीरंग आबा वळके,बेलकुंडचे सरपंच विष्णू महाराज कोळी,आशिवचे सरपंच गोविंद मदने,तावशीचे सरपंच, चिंचोली गावचे सरपंच तसेच दिलीप बिल्डकॉन कंपनीचे व NHAI चे अधिकारी,सर्व भागातील शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.