पाकिस्तानात जाऊन राहिल, पण लस घेणार नाही माझा व्हिडिओ दिल्ली पर्यंत पाठवा व मोदिला पण दाखवा
वायरल व्हिडिओ मध्ये औसा तालुक्यातील व्यक्ती ने केलेला संवाद
औसा प्रतिनिधी औसा तालुका वार्तापत्र
औसा तालुक्यात लसीकरणासाठी लसीकरण आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून डोअर टु डोअर लसीकरण मोबाईल युनिट मार्फत आरोग्य विभाग करत आहेत. आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी सारोळा ता. औसा येथील बंगट टेंकाळे यांना लस घेण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना म्हणाले मी लस घेणार नाही
लस घेण्यासाठी आग्रह करु नका मी पाकिस्तानमध्ये राहण्याला जाईल माझा व्हिडिओ दिल्ली पर्यंत पाठवा व मोदिला पण दाखवा लस घेतल्यामुळे माझ्या गावातील चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मी लस घेणार नाही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले मतदान रेशन बंद करण्यात येईल माझा सर्व बंद करा मी पाकिस्तान मध्ये जाईल पण मी लस घेणार नाही असे उद्धट उत्तर आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे कर्मचारी नाराज होवुन पुढे गेले कर्मचाऱ्यांनी एक व्हिडीओ बनवून व तो व्हिडिओ सर्व सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे सर्वत्र या व्हिडिओ ची चर्चा जोरदार सुरु आहे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यासाठी शासन प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने मिशन कवच-कुंडल अभियान राबविण्यात आले आहे या अंतर्गत जनजागृती करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले दरम्यान सध्या शेती कामाचे दिवस असल्याने शेतकरी शेतमजूर सकाळी लवकर शेतावर जात असतात त्यामुळे लसीकरणासाठी काही प्रमाणात अडचणी येत आहेत परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेती बांधावर पोहोचून लसीकरण केले आहे अठरा वर्षाच्या पुढील प्रत्येकांनी लस घ्यावी म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या अंतर्गत पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ही मोहीम सुरू आहे गाव पातळीवरील ग्रामसेवक शिक्षक आशा स्वयंसेविका यांनी दिवसभर गावात थांबून 100% लसीकरण करावे यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी नियोजन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनीही आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे अठरा वर्षापुढील व्यक्तीस लसीचा पहिला अथवा दुसरा डोस जो लागू असेल तो देऊन 100% लसीकरण करण्यात यावे त्यासाठी जिल्हा तालुका स्तरावरील सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख पूर्णवेळ संबंधित असलेल्या गावात उपस्थित राहून या विशेष मोहिमेचे पर्यवेक्षण करावे असेही सीईओ गोयल यांनी स्पष्ट केले आहे
१८ ते पुढील वयोगटातील सर्व युवक व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी जिवाचे रान करत आहेत. गावागावांत प्रत्येक नागरीक लसवंत व्हावा यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह शाळेचे शिक्षक , अंगणवाडी सेविका , आशा कार्यकर्ती , गाव पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते तळमळीने काम करत असून या सर्वांच्या प्रयत्नाला आणि कामाला मनापासून धन्यवाद. मात्र शासनाच्या माध्यमातून लसीकरणाची ही यंत्रणा घराघरापर्यंत पोहोचली असताना सुध्दा अनेक गावातील अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतले नाही अशी उदाहरणे पहायला मिळत आहेत. खरंतर जेंव्हा सर्वप्रथम लसीकरणाची सुरूवात झाली तेंव्हा प्रत्येक नागरिकांपर्यंत ही लस लवकर पोहचेल का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित करून एकप्रकारे सरकारवर अविश्वास दाखवला होता परंतु १३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात भारत सरकार आणि प्रत्येक राज्य सरकारने लसीकरणाचे शिवधनुष्य लीलया पेलले असून हे सरकारचे मोठे यश म्हणावे लागेल. कांहीं महिन्यांतच ही लसीकरण मोहीम घराघरापर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागातील गावांनी सुध्दा लसीकरणात मोठा टप्पा गाठला आहे. आता प्रत्येक गाव लसीकरण मोहिमेत शंभर टक्के यशस्वी व्हावा यासाठी प्रशासन दिवसरात्र काम करत आहे. आता ही मोहीम लवकरात लवकर यशस्वी करण्याची जवाबदारी नागरिक म्हणून आपली असून या दिवाळी पर्वात दिपोत्सव साजरा करण्याच्या आधी सर्वांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होवून ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही अशा नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्सहान देवून त्यांना लसवंत करू असा संकल्प करूनच मग दिपोत्सव साजरा करूया.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.