लातूर शहरात एकाच दिवशी 04 ठिकाणी मटक्यावर छापा.

  *लातूर शहरात एकाच दिवशी 04 ठिकाणी मटक्यावर छापा. 



                *लातूर शहरात एकाच दिवशी 04 ठिकाणी मटक्यावर छापा. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,(लातूर शहर) यांचे विशेष पथकाची लातूर शहरातील अवैध धंद्यावर कारवाई.जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 49 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. 09 आरोपी विरुद्ध 4 गुन्हे दाखल.*








लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

           या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते.त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे मार्गदर्शनात जिल्ह्यामधील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

          सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. 

          सदर पथक लातूर शहरात अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास मिळालेल्या माहितीवरून लातूर शहरात विविध ठिकाणी छापे मारून, स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मिलन डे,कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना आढळून आलेल्या इसमा विरोधात पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे एकूण 09 आरोपी विरुद्ध 04  गुन्हे  दाखल करण्यात आलेले आहेत.



*👉पोलीस ठाणे विवेकानंद चौक,*

 गुन्हा रजिस्टर क्रमांक 756/2021, कलम 12 मुंबई जुगार कायदा.

1) विशाल लक्ष्मण गायकवाड वय-30 वर्ष, राहणार-संजय नगर, लातूर.

2) (बुकी) संजय गायकवाड राहणार बौद्ध नगर, लातूर.

 यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 15,330/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

*👉पोलीस ठाणे विवेकानंद चौक,*

 गुन्हा रजिस्टर क्रमांक 757/2021 कलम 12 मुंबई जुगार कायदा.

1) सूर्यकांत मच्छिंद्र सांगा पुरे वय 33 वर्ष राहणार महादेव नगर लातूर

2) बुकी- संजय गायकवाड राहणार बौद्ध नगर, लातूर

यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 18,710/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

*👉पोलीस ठाणे विवेकानंद चौक,*

 गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2021 कलम 12 मुंबई जुगार कायदा.

1) अझर जावेद पठाण, वय 30 वर्ष, राहणार- आनंद नगर, लातूर.

2) सय्यद ताहेरअली, वय 40 वर्ष, राहणार-आनंद नगर, लातूर. 

3) सोहेल मिनाज शेख, वय 23 वर्षे, राहणार-गवळी नगर, लातूर.

4) जावेद पाशामिया शेख, वय 42 वर्ष, राहणार- गवळी नगर, लातूर.

5)बुकी- संजय गायकवाड राहणार बौद्ध नगर, लातूर यांच्याकडून

जुगाराचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 1,02,480/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 

*👉पोलीस ठाणे विवेकानंद चौक,*

 गुन्हा रजिस्टर क्रमांक 754/2021 कलम 12 मुंबई जुगार कायदा.

1) अभिनय एकनाथ कांबळे, वय 31 वर्ष, राहणार- इंद्रा नगर ,लातूर.

2)अमोल गोरख श्रंगारे, राहणार इंद्रा नगर लातूर.वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरचे गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत. 

      


     सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील पोलीस अमलदार लक्ष्मीकांत देशमुख, रमेश चौधरी, गणेश खंदारे, मनोज खोसे, संतोष शिरसागर, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,लातूर विशेष पथकातील स.फौ. वहीद शेख, रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के तसेच पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलिस उपनिरीक्षक महेश गळगट्टे, जिलानी मानुल्ला यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या