कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचना जारी - जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे

                                                                                   दिनांक:- 30 नोव्हेंबर, 2021

 

कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सुचना जारी

                                                   - जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे






लातूर,दि.30 (जिमाका)-  आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रोन व्हेरीयंटच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात चिंता निर्माण झाली असून या व्हेरीयंटचा प्रसार पूर्वीच्या विषाणूपेक्षा ५०० पटीने अधिक होत असल्याचे आफ्रिकन देशांमध्ये निदर्शनास आले असल्याने  यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती.  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अरविंद लोखंडेयांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून कोविड-१९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या संदर्भातील यापुर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करून सर्व आर्थिकसांस्कृतिकसामाजिकक्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्याना विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण नियमित वेळानुसारपूढील अटी व शर्तीच्या अधीन राहूनमार्गदर्शक सुचनांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

कोविड अनुरूप वर्तनाचे पालन: -राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदातेपरिवास्तूंचे (जागांचे) मालकपरवानाधारकआयोजकइत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागतसेवा घेणारेग्राहकअतिथीइत्यादींनी काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंडकोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडांनुसार असेल.

संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता (सर्व प्रकारच्या लहान-मोठी दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, सुपरशॉप्स, पेट्रोलपंप, चित्रपटगृह, समारंभ, संमेलन, मेळावे ई. बाबत) :- तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे कीखेळाडूअभिनेतेइत्यादी), अभ्यागतपाहुणेग्राहक यांचे यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसारसंपूर्ण लसीकरण केलेले असावे. ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले नाही अशा व्यक्तींनी किमान ०१ लसीचा डोस दिनांक ०५ डिसेंबर २०२१ पर्यंत घेणे आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या लहान-मोठी दुकाने, आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, सुपरशॉप्स, पेट्रोलपंप, चित्रपटगृह, समारंभ, संमेलन, मेळावेआठवडी बाजार इत्यादी ठिकाणीसंपूर्ण लसीकरण झालेल्या मालक / कर्मचारीद्वारे व्यवस्थापन करावे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागतग्राहक, व्यक्ती यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे किंवा दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत किमान लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या व्यक्तीनाच प्रवेश द्यावा.

जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांनी १००% टक्के स्वतःचे व कुटुंबीयांचे लसीकरण करून घेणे बंधनकारक राहील. तसेच सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य, एक डोस पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना द्वितीय प्राधान्य आणि ज्यांचे एकही डोस पूर्ण झाला नाही त्यांना लसीचा पहिला डोस घेण्याबाबत प्रवृत्त करून त्यांचे धान्य वितरण करावे. (दोन डोस झालेले, एक डोस झालेले, लसीकरण न झालेल्या लाभार्थ्यांचे स्वतंत्र वेळापत्रक रास्तभाव दुकानदार यांनी दुकानाच्या फलकबोर्डाशेजारी लावून धान्य वितरण करण्याची कार्यवाही करावी जेणेकरून संसर्गाचा संभावित धोका टाळता येईल.)

हॉटेल्‍स २. रेस्‍टॉरन्‍ट्स ३. भोजनालय ४ ढाबे ५. खानावळी ६६. इत्‍यादी खाद्यसेवा देणा-या आस्‍थापना:-मार्गदर्शक सूचनाः- जिल्‍हयातील सर्व प्रकारचे हॉटेल्‍स, रेस्‍टॉरन्‍ट्स, भोजनालय, ढाबे, खानावळ, इत्‍यादी खाद्यसेवा देणा-या आस्‍थापनेतील चालक / मालक व कामगार या कार्यरत सर्वांचे लसीकरण अनिवार्य आहे. नमुद सर्व आस्‍थापनेतील मनुष्‍यबळाचे कोविड-१९ प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्‍थापनाचे मालक / प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्‍यांच्‍या अधिनस्‍त मनुष्‍यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्‍या कार्यरत कामगारांचे, मनुष्‍यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

जिल्‍हयात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्‍टपूर्ती व्‍हावी यादृष्‍टीने लसीकरण वृध्‍दींगत करण्‍यामध्‍ये सामाजीक जबाबदारी म्‍हणून सहभाग नोंदवावा. अन्‍न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत नोंदणीकृत सर्व उपरोक्‍त नमुद आस्‍थापनाच्‍या ठिकाणी सहायक आयुक्त अन्‍न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत वेळोवेळी तपासणी करण्‍यात येईल व ज्‍या ठिकाणी कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्‍यबळाची लसीकरणाची किमान ०१ मात्रा (Dose) देखील पूर्ण झालेली नसल्‍याचे आढळून आल्‍यास सदर आस्‍थापना / दुकाने यांचेविरुद्ध दंडात्‍मक करण्यात येऊन आस्थापना सील करण्‍यात येतील. या सुचना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने / वाईन-बियरशॉप / देशीदारू दुकाने / FL3 अनुज्ञप्ती धारक विक्रीचे ठिकाणे:- मार्गदर्शक सूचना :-  जिल्हातील सर्व मद्यविक्री दुकानेवाईन/बिअर शॉपदेशी दारु दुकाने, FL3 अनुज्ञप्ती धारक मद्य व मद्यार्क विकीचे ठिकाणे आस्थापनांमध्ये कार्यरत कामगार व मनुष्यबळ यांची कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/अनुज्ञप्ती धारक यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित दुकाने आस्थापना मालकाने त्यांच्या अधिनस्तः मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्त करून घ्यावे. ज्या कार्यरत कामगारांचेमनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावेजेणेकरुन विक्रेता व ग्राहकवर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

उपरोक्त नमूद सर्व दुकाने व आस्थापनांच्या ठिकाणी जेथे कामगार व ग्राहकांची वर्दळ असते अशा सर्व ठिकाण लसीकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण केलेली असणे आवश्यक व लसीकरणाची एकही मात्रा झालेली नसल्यास अशा कामगार व कार्यरत मनुष्यबळास कामाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच मद्य खरेदीकरीता येणा-या ग्राहककामगार व कार्यरत मनुष्यबळाचे आधारकार्ड/मोबाईल क्रमांकवरुन लसीकरण झाल्याची पडताळणी करण्यात यावी.

जिल्ह्यातील मद्यविक्री दुकानेवाईन/बिअर शॉपदेशी दारु दुकाने, FL3 अनुज्ञप्ती धारक विक्री आस्थापनांच्या ठिकाणी जेथे कामगार व ग्राहक संख्या अधिक असते अशा ठिकणी लसीकरणाची उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिने त्या-त्या आस्थापनाबाबत जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य वैद्यकीय अधिकारीमहानगर पालिकेच्या / नगरपालिकेच्या मदतीने विशेष मोहिम राबवूनअधिकाधिक ग्राहकांचे लसीकरण वृद्धिंगत करण्यासाठी सामाजीक जबाबदारीतून मद्य विक्रेत्यांनी सहभाग नोंदवावा.

 उपरोक्त सर्व नमुद आस्थापनाच्या ठिकाणी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्फत उपरोक्त सर्व आस्थापना ज्या ठिकाणी कामगार व कार्यरत मनुष्यबळाचीग्राहकांची लसीकरणाची किमान ०१ मात्रा (Dose) पूर्ण झालेल्या असतील अश्याच मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीसाठी दुकाने चालू ठेवण्यास मुभा राहील व ग्राहकांना मद्य खरेदीस मुभा राहील. याबाबत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास व विना लसीकरण दुकाने खुली केल्यास अशी दुकाने Seal करण्याची कारवाई करण्यात येईल.

जिल्ह्यातील उपरोक्त नमुद सर्व आस्थापनांच्या ठिकाणी कार्यरत सर्व कामगार व ग्राहकास प्रवेशद्वारावर (Entry Point) लसीकरण झाल्याबाबत पडताळणी करण्यात येईल व किमान ०१ मात्रा झालेली नसल्यासअशा व्यक्तिंना उपरोक्त नमूद ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही व अशा ग्राहकांना मद्य विक्रेत्याकडून मद्य खरेदी करता येणार नाही. याबाबत "No Vaccine No Entry" हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घेऊन पूर्तता करावी.

वरील सर्व नियम अंत्यत काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी मद्यविक्री दुकानेवाईन / बिअर शॉप, देशी दारु दुकाने, FL3 अनुज्ञप्ती धारक विक्री व्यावसायिकांची राहील. वरील मार्गदर्शक सूचना व कोविड-19 लसीकरणाबाबतचा अद्यावत अहवाल संबंधित सर्व मद्य विक्री व्यावसायिक यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास वेळोवेळी सादर करावा. या सुचना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

महाराष्ट्र राज्यात प्रवास:- कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचेया बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांव्दारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केलेले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे त्यांचेसाठी बंधनकारक असेल तसेच दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी असेल.

तसेच परदेशातून मागील पंधरा दिवसांत प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयास विदेश प्रवास केल्याबाबतचे स्वयघोषणापत्र (लातूर शहरातील नागरिकांनी moh.mclatur1@gmail.com ग्रामीण भागातील नागरिकांनी idsplatur@gmail.com या ईमेलद्वारे सादर करणे आवश्यक राहील. तसेच ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे त्यांचेसाठी बंधनकारक असेल.  

सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये (रेल्वे, रा.प. महामंडळांचे बसेस, खाजगी बसेस, परवानाधारक टॅक्सी / ऑटोरिक्षा  ई.) संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच (सर्व वाहक / चालक / प्रवासी) परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram- MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथाछायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठीईतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे जे व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठीप्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व ईतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. 

ऑटोरिक्षा प्रवास :-    मार्गदर्शक सूचना:- जिल्‍हयात सर्वत्र रिक्षा प्रवासी वाहनाद्वारे अनेक प्रवासी प्रवास करीत असतात त्‍यामुळे सर्वत्र लसीकरण (Vaccination) होणे अपेक्षीत आहे. रिक्षा चालकाचे कोविड-१९ प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा परिहवन विभाग व वाहतूक विभागाने करावी. रिक्षा चालकाने स्‍वतःचे व त्‍याच्‍या कुटुंबाची लसीकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण केलेली असणे आवश्‍यक व त्‍यासंबंधी लसीकरण झाल्‍याची पडताळणी परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभागा मार्फत करण्‍यात यावी, व आवश्‍यकतेनुसार तपासणी दरम्‍याण सदर विभागास लसीकरणाबाबतचे प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.

प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा यांनी वेळोवेळी तपासणी करावी लसीकरणाची एकही मात्रा न झालेल्‍या रिक्षा चालकांवर दिनांक. ०५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून दंडात्‍मक कारवाईसह रिक्षा जप्‍त करण्‍याची कारवाई करावी. या सुचना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

प्रवासी वाहने जसे – १. खाजगी आंतरराज्‍यीय व आंतरजिल्‍हा बसेस (प्रत्‍यक्ष व Online बुकींगसह) Rental Vehicle, तत्‍सम इतर प्रवासी वाहने:- मार्गदर्शक सूचनाः- जिल्‍हयात सर्वत्र प्रवासी वाहनांद्वारे अनेक प्रवासी प्रवास करीत असतात त्‍यामुळे सर्वत्र लसीकरण (Vaccination) होणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेवून खाजगी आंतरराज्‍यीय व आंतरजिल्‍हा (प्रत्‍यक्ष व Online बुकींगसह) Rental Vehicle, तत्‍सम इतर प्रवासी वाहने, संबंधीत चालक, वाहक कार्यरत कर्मचारी सहायक कामगार वर्ग, कार्यरत सर्व मनुष्‍यबळ यांच्‍या कोविड-१९ प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित वाहन मालक / Travel Company प्रमुख / मालक यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्‍यांच्‍या अधिनस्‍त मनुष्‍यबळाकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्‍या कार्यरत कामगारांचे मनुष्‍यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रावर जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे.

ट्रॅव्‍हल्‍स एजन्‍सी यांनी ट्रॅव्‍हल्‍स-बसेसद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांची लसीकरणाची किमान एक मात्रा (Dose) पूर्ण केली असल्‍याची बुकिंग काऊंटरवर तसेच Online Booking स्‍थळावर Online Ticketing संबंधी Software मध्‍ये कोविड-१९ लसीकरण झाल्‍याबाबत विशेष Field चा समावेश करावा. लसीकरणाची किमान १ मात्रा झालेल्‍या प्रवाशांनाच तिकीट देण्‍यात यावे. लसीकरणाची एकही मात्रा न झालेल्‍या प्रवाशांना तिकीट अदायगी करण्‍यात येऊ नये. तसेच प्रवाशांचे आधारकार्ड / मोबाईल क्रमांकावरुन लसीकरण झाल्‍याची पडताळणी करण्‍यात यावी. तसेच लसीकरणाबाबतचे प्रमाणपत्राची छायाप्रत रेकॉर्डवर ठेवावी. अपवाद एखादा प्रवासी गंभीर आजारी  असल्‍यासव तो सद्यस्थितीत लस घेऊ शकत नसल्‍यास वैद्यकीय पुरावा ग्राहय धरुन त्‍यांना सुट देण्‍यात यावी.

जिल्‍हयात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्‍टपुर्ती व्‍हावी यादृष्टिने लसीकरण वृध्‍दींगत करण्‍यामध्‍ये सामाजीक जबाबदारी म्‍हणून सहभाग नोंदवावा.

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी उपरोक्‍त सर्व वाहना संदर्भात व त्‍यासंबंधी कार्यरत मनुष्‍यबळाचा वेळोवेळी तपासणी करावी व यामध्‍ये सदर मनुष्‍यबळाची लसीकरणाची किमान ०१ मात्रा (Dose) पूर्ण झालेल्‍या असतील अशाच वाहन चालक / मालक प्रवासी वाहतुकीस मुभा राहील, अन्‍यथा सदर वाहनांवर दंडात्‍मक कारवाई / वाहन जप्‍त करण्‍यात येईल. जिल्‍हयात सर्वत्र लसीकरण झाल्‍याबाबत पडताळणी करण्‍यात येईल व किमान ०१ मात्रा झालेली नसल्‍यास, याबाबत No Vaccine No Travel हा नियम अत्‍यंत काटेकोरपणे पाळला जाईल याची सर्वांनी नोंद घेऊन पूर्तता करावी. या सुचना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

सर्व प्रकारचे कार्यक्रमसमारंभ(चित्रपटगृहनाट्यगृहमंगलकार्यालयसभागृह) इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध:- चित्रपटगृहनाट्यगृहमंगलकार्यालयसभागृहइत्यादी बंदिस्त / बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या / समारंभाच्या / उपक्रमाच्या बाबतीतजागेच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी असेल.संपूर्ण खुल्या असलेल्या (Open to Sky) जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची परवानगी असेल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमताऔपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे)जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक निदर्शनास आल्यास स्थानिक (तालुका) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणअशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे कार्यक्षेत्रातील कोणत्याही विभागाचे तसेच  स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी पाठवून तेथे उक्त नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड-१९ च्या प्रसाराचा धोका लक्षात घेतातेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यासप्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीलाकार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार असतील. या सुचना दिनांक ०५.१२.२०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध:- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, जर योग्य वाटल्यास, कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविण्यात येतील.  संपूर्ण लसीकरणाची व्याख्या:- संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ- लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्तीअसा आहेकिंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे कीज्यामुळे त्याला किंवा तिला वैद्यकीय कारणामुळे (दुर्धर आजार असल्यास) लस घेण्यास शक्य नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्तीअसा आहेकिंवा १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्तीअसा आहे.

सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी कार्यालये येथील कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांचे लसीकरण करणे बाबत:- जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी कार्यालये येथील अधिकारी / कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांचे संपूर्ण लसीकरण झालेबाबत पुराव्यांसह प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. ज्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला नाही त्यांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत पहिला डोस घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र आपले कार्यालय प्रमुखास सादर केल्याशिवाय कार्यालय प्रमुख संबंधितांचे वेतन अदा करणार नाहीत. या सुचना दिनांक ०५. डिसेंबर  २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड:- व्याख्या : कोविड-१९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरूप वर्तन (CAB) म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्येखाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करू शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतोत्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपद्धती (Methodology) दिलेली आहे.

मूलभूत कोविड अनुरूप वर्तनाचे काही पैलू खालील नमूद केले असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन करणे बंधनकारक असेल. सर्व दुकाने / आस्थापना / कार्यालये / सार्वजनिक ठिकाणे / कारखाने / संस्थां ई. यांनी सुनिश्चित करावे कीत्यांचे सर्व कर्मचारीत्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागतग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्तीत्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि / किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करतानात्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. ज्या संस्थात्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला कार्य करीत असेल अशा सर्व ठिकाणीसर्व कर्मचा-यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझरसाबण व पाणीतापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्याची त्यांची जबाबदारी असेल.

नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करावे. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असावे. (रुमालालामास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्तीदंडास पात्र असेल.) जेथे-जेथे शक्य असेल तेथेनेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखावे. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात धुवावे. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरतानाक / डोळे / तोंड यांना स्पर्श करणे टाळावे. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखावे. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करावे. खोकताना किंवा शिंकतानाटिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाकावे आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करावेजर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हाताचा वापर न करता हाताचा वाकवलेला कोपर तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखावे. कोणालाही शारीरिक स्पर्श न करतानमस्कार / अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.

दंड / शास्ती :- या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीलाअसा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगीरुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागतग्राहकइत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत)जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्तअशा संस्‍थांना किंवा आस्‍थापनांना सुध्‍दा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तेथील अभ्यागतग्राहकइत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यास नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आल्यासकोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंतअशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB) किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे (SOP) पालन करण्यात कसूर केल्यासप्रत्येक प्रसंगीरुपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यासकोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्येकोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आल्यासकोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींनारूपये ५००/- इतका दंड आकारण्यात यावे. तसेच सेवा पुरविणारे वाहनचालकमदतनीसकिंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीतमालक परिवहन एजन्सीसकसुरीच्या प्रत्येक प्रसंगीरुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यासकोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचा परवाना रद्द करण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकीसंबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यासवर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५, साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० ई. मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम / धोरणे वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय / मुद्देराज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार / आदेशांनुसार असतील.

प्रस्तुत आदेश दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील (ज्या व्यक्तींनी लसीकरण करून घेतले नाही त्यांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत लसीकरणाची पहिली डोस पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना सर्व सेवा-सुविधांचा लाभ घेता येईल.). सर्व संबंधित प्रशासकीय विभाग: महसूल / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था / आरोग्य / पोलीस विभाग / रेल्वे विभाग / रा.प.महामंडळ / प्रादेशिक परिवहन विभाग ई. यांनी या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असेही आदेशात नमुद केले आहे.

 

****



--
लातूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या बातम्यांसाठी पुढील लिंकला फक्त क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी.

फेसबुक पेज-  DIOlatur-ज़िल्हा-माहिती-कार्यालय-लातूर

ट्विटर-  https://twitter.com/Infolatur
ब्लॉग-  http://laturdio.blogspot.com/

मुख्यालय संकेतस्थळ-https://mahasamvad.in/ https://www.facebook.com/MahaDGIPR https://www.facebook.com/CMOMaharashtra/ https://twitter.com/MahaDGIPR http://www.mahanews.gov.in  http://maharashtradgipr.blogspot




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या