उमर फारुक युवा मंचचा कौतुकास्पद उपक्रम
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील कालन गल्ली येथे उमर फारुक युवा मंचच्या वतीने दिनांक 3 डिसेंबर 2021 शुक्रवार रोजी नागरिकांच्या सोयीसाठी कोविड लसीकरण अभियान उमर फारुक युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पप्पुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.यावेळी या शिबिरामध्ये महिलांनी जास्त भाग घेतला.या शिबिरामध्ये 577 नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतला.या शिबिरा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कलीम शेख,गुलाब शेख, वैजनाथ इळेकर,सलीम सय्यद,बाबु शेख,खाजा पटेल,फजल पटेल,हज्जु मलंग,सज्जाद शेख,बाबा शेख,मेहराज शेख,तोहीद पटेल,सद्दाम शेख,अचुत पाटील,शोएब सय्यद,अमर शेख, इस्माईल शेख,मम्मु शेख,मुबीन करपुडे,खाजा पटेल, शाहेद शेख,जुनेद शेख,शफीक शेख यांची उपस्थिती होते.
यावेळी या शिबिरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयचे कर्मचारी अतुल कांबळे,सगर ए एम ,लखन लसणे, वंदना ढाकणे,कलशेट्टी मॅडम, भैय्यासाहेब रोंगे यांनी या शिबिरामध्ये सर्वात जास्त कोव्हीड लसीकरण नागरिकांनी केल्याबद्दल पप्पु भाई यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.