जिल्हयातील नगर पंचायत निवडणूक
हद्दीतील मद्य विक्री बंद
लातूर,दि.10(जिमाका):- जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट तालुक्यातील अशा एकूण 04 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार असून दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशान्वये तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 व त्याअंतर्गत विविध नियमातील तरतुदींनुसार प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हयातील शिरुर अनंतपाळ,चाकूर,देवणी व जळकोट नगरपंचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार पूढील प्रमाणे पूर्णत: बंद ठेवण्या बाबत आदेश जारी केले आहेत.
दिनांक 19 डिसेंबर 2021 रोजी मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे सायं. 6.00 वाजेपासून. दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी मतदानाच्या पूर्वीचा दिवस- संपूर्ण दिवस दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी मतदानाचा दिवस- संपूर्ण दिवस. दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणीचा दिवस- मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत.
या आदेशाची शिरुर अनंतपाळ, चाकूर, देवणी व जळकोट नगरपंचायत हद्दीतील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.