चंपाषष्ठी निमित्त औसा शहरात येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष
औसा प्रतिनिधी
मार्तंड भैरव घटस्थापने पासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबा भक्त पाच दिवसाचा उपवास करून चंपाषष्टी दिवशी बाजरीच्या रोडगे यासह वांगे आणि कांद्याच्या पातीचे भरीत केलेला नैवद्य दाखवून उपवास सोडतात. चंपाषष्ठी च्या दिवशी औसा शहरांमध्ये काठ्या आणि कावडीची भव्य मिरवणूक काढून मल्हार भक्तांनी अतिशय उत्साहाने मध्ये हा सण साजरा केला. मल्हार भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. कपाळावर भंडारा लावून हातात वसारी घेऊन हलगीच्या तालावर खंडोबा फक्त का क्या कावडी सह नाचण्यात दंग झाले होते. शिवा मल्हारीचा येळकोट घे आणि येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत खंडोबा भक्तांनी औसा शहरामध्ये वातावरण दुमदुमून निघाले होते. येथील माळी गल्ली भोई गल्ली पाटील गल्ली आणि नागरसोगा गावातील काठ्या कावड इंची औसा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील भादा मातोळा तपसे चिंचोली याठिकाणी चंपाषष्ठी निमित्त खंडोबा यात्रा भरत असते. भादा येथे यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवसीय यात्रा महोत्सवामध्ये भादा मुरुड श्री क्षेत्र जेजुरी येथील वाघ्या-मुरळीच्या मल्हार गीतांचा कार्यक्रम तसेच जंगी कुस्त्या व कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औसा शहरासह तालुक्यातील खंडोबा भक्तांनी चंपाषष्ठी चा उत्सव अत्यंत उत्साह मध्ये साजरा केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.