मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस



https://youtu.be/IxdWC4r-lGQ

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस









शेख बी जी

औसा: दि. 22 डिसेंबर 2021 बुधवार रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन सुरू आहे.या साखळी धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शासनाने वेळोवेळी अनेक आयोग व समित्या बनवून महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या परिस्थिती बाबत आढावा घेतला व प्रत्येक आयोग व समित्यांना या समाजाला उन्नती व प्रगती करण्यासाठी शैक्षणिक आर्थिक व सामाजिक स्तरावर आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात जोडणे अनिवार्य असले बाबत शिफारस केलेली आहे. परंतु या राज्यातील अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत यापूर्वीच्या सरकारांनी  उदासीनता दाखवली ज्यामुळे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिनांक 22 डिसेंबर 2021 पासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण बाबत ठोस निर्णय घेऊन अध्यादेश पारित करावा. जेणेकरून या समुदायास देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देण्याची संधी प्राप्त होईल. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही औसा शहरातील मुस्लिम समुदाय दिनांक 22 डिसेंबर  2021बुधवार पासुन ते 24 डिसेंबर पर्यंत असे तीन दिवस  सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत औसा तहसील कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन चालूच राहणार आहे.  आजचा साखळी धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनात आम्ही औसेकर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सोशल डिस्टन्स व कोरोनाचे नियम पाळून साखळी आंदोलन करीत आहेत. आंदोलन स्थळी वेगवेगळे मान्यवर येऊन या आंदोलनास आमचा पाठिंबा असल्याचे सांगत आहेत व हे आरक्षण किती महत्वाचा आहे ते सांगुन या बाबत ताबडतोब शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या