आम आदमी पार्टीच्या वतीने अँड हाशम पटेल यांचा सत्कार

 आम आदमी पार्टीच्या वतीने अँड हाशम पटेल यांचा सत्कार


.




औसा प्रतिनिधी

औसा येथील प्रसिद्ध विधीज्ञ आणि कवी adv  हाशम पटेल यांचा डोंगराचा आक्रोश हा त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे .या कवितेच्या रुपातुन ते मानवी जीवन आणि सृष्टीचा एक अभिन्न भावबंधच स्पष्ट करतात .पशु - पक्षी,जीव-जंतू ,वृक्षवेली,जल-जमीन,जंगल,नद्या आणि डोंगर यांचे अस्तित्व आहे.हे ही कविता सिध्द करते ,या सृष्टी रुपाचा मानव हा एक भाग असुन निसर्गाच्या अंकितच मानवी जीवनाचा शाश्वत विकास होऊ शकतो पण भरधाव विकासाच्या गतीवर स्वार होत सृष्टी विनाशाचे आपण भागीदार ठरत आहोत आजच्या विकासाची संकल्पना सृष्टी विनाशाकडे नेणारी आहे.हेअॅड हाशम पटेल अत्यंत अंत:  करणपूरक पुन्हा पुन्हा सांगत आहेत.हा डोंगरांचा विनाश पाहून त्यांचे मन तीळतीळ होत आहे.डोंगराचा विनाश नसून मानवी संस्कृतीचा आत्मनाश आहे.असा अनेक कवितेतून दिलेला डोंगर बचावाचा संदेश हा निसर्ग रक्षणाचा, पर्वत रक्षणाचा आणि विश्व रक्षणाचा आहे.. यावेळी अॅड हाशम पटेल यांनी डोंगरांचा आक्रोश कविता संग्रह मधुन सांगितले आहे.नाशिक येथील  आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये डोंगरांचा आक्रोश कविता संग्रह प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख, मिडीया प्रमुख मुख्तार मणियार यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी रशीद मुल्ला सास्तुरवाले ,चॉंद शेख कोरंगळा,सचीन जाधव,अॅड शाहनवाज पटेल आदि उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या