गंजगोलाई ते हरंगुळ (बु.) मंदार पर्यन्त शहर बस वाहतूक सेवा सुरु करणेबाबत लोकाधिकार संघाची मागणी...
लातूर : दि. ८ ( प्रतिनिधी )- लातूर पासून ९ किलोमीटर अंतरावर असलेले शहरालगतचे हरंगुळ (बु.) हे गाव १० हजार पेक्षा जास्ती लोकसंख्येचे गाव असुन, गावाचा दैनंदीन व २४ तास लातूर शहराशी व्यवहार आहे. तसेच नवीन अतिरीक्त एम आय डी सी ही हरंगुल (बु.) गावच्या शिवारातच आहे. लातूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीपासुन गावापर्यन्त वेगवेगळ्या नगराद्वारे वस्ती झालेली आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार तसेच शहरात नोकरीसाठी व वेगवेगळ्या उद्योगधंद्याच्या निमीत्ताने लोकांचा लातूरशी दैनंदीन संपर्क आहे. तसेच अतिरीक्त एम आय डी. सी मध्ये नौकरी व उद्योगासाठी लोकांची सतत ये जा आहे. या सर्वांचीच शहर बस वाहतूक सेवा सुरु झाल्यामुळे फार मोठी सोय होणार आहे. तसेच महानगरपालीकेने हे मार्ग सुरू केल्यामुळे शहर बस वाहतूक मोठया प्रमाणात फायद्यात राहणार आहे.
तेंव्हा गंजगोलार्ड ते महिला पॉलीटेक्नीक मार्गे हरंगुळ (बु.) मंदार पर्यन्त प्रत्येक तासाला फेरी सुरू करावी. आणि गंजगोलाई ते रेल्वे स्टेशन मंदार मार्गे हरंगुळ (बु.) पर्यन्त ची फेरी सुद्धा दर तासाला सुरवात करावी.
हे दोन्हीही मार्ग जनतेच्या सोयीचे व महानगरपालीकेच्या फायद्याचे असणार आहेत.
या दोन्ही मार्गावरील शहर बस वाहतूक सेवा तात्काळ सुरू करून या भागातील प्रवाशांना दिलासा दयावा, अशी मागणी लोकाधिकार संघाचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान भालेराव, हरिश्चंद्र बरुरे, निवृत्ती तिगीले, रामचंद्र बरुरे, रामचंद्र तिगीले, रहिमतुल्ला सय्यद आदींनी लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल व परिवहन सभापती मंगेश बिराजदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्त शिंदेकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.