मुस्लिम आरक्षणासाठी लातुरात निदर्शने
--------------------------------------------------
लातूर - येथे दिनांक २४/१२/२०२१ वार शुक्रवार रोजी दुपारी ०३ वाजता मुस्लिम आरक्षण समीतीच्या वतीने मुंबई येथे हिवाळी अधिवेशन चालू असून अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षण या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात आले याविषयी सविस्तर माहिती अशी कि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यकाळात शासकीय / निमशासकीय सेवामध्ये आणि शैक्षणिक संस्थामध्ये मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय क्र. अविवि २०१४ / प्र.क्र. ८१/ का-७ मंत्रालय मुंबई दिनांक १९ जुलै २०१४ शासन निर्णय महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १५ (४) १५ (५)१६(४) व ४६ मधील तरतुदी नुसार विषेश मागास प्रवर्ग (अ) (Special Background Category -A ) निर्माण करून त्यामध्ये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करण्यात येत आहे शासन अध्यादेश क्रमांक १४ दिनांक ०९ जुलै २०१४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विषेश मागास प्रवर्ग (अ) अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरतीमध्ये व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी ५% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यभर आंदोलन करण्यात आले तसेच लातुरातील मुस्लिम आरक्षण समीतीच्या वतीने निदर्शने करण्यात आले यावेळी मान्यवर प्रतिष्ठित विचारवंत आंदोलनकारी मुस्लिम आरक्षण समर्थक यांची प्रामुख्याने विषेश उपस्थिती होती
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.