एसटी बंद असल्यामुळे सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड
औसा(प्रतिनिधी)कोरोणा विषाणू आणि व मायक्रोन चा प्रादुर्भाव कमी असताना आणि शाळा महाविद्यालय सुरू झाले असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच गावातील मुक्कामी बसेस सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी घेऊन जात होत्या परंतु बसेस बंद असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही,
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून अधिक प्रवास भाडे द्यावे लागत आहे.परिणामी विद्यार्थी व सामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.