अधिकाधिक वापर करावा--अप्पर जिल्हाधिकरी अरविंद लोखंडे

 प्लास्टीलच्या बॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा

अधिकाधिक वापर करावा--अप्पर जिल्हाधिकरी अरविंद लोखंडे



          लातूर दि.3 (जिमाका):- प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गातील अनेक घटक हेप्लास्टीलच्या बॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा


 प्रभावित होतात. त्यामुळे प्लास्टीलच्या बॅग ऐवजी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करावा असे अहवान अप्पर जिल्हाधिकरी अरविंद लोखंडे यांनी केले आहे.


            दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लातूर व महाराष्ट्र प्रदूषण विकास मंडळ यांच्या सयुक्ति विद्यमाने, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शासकीय वसाहत, जिल्हा परिषद शाळा लातूर येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवी व मास्क वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. 


             या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद लातूर चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी प्रभू जाधव, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी मनसुर पटेल, शिक्षण विस्तार अधिकरी (प्राथमिक) डी बी पवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. माळी, मुख्याध्यापिका श्रीमती कोकणे, माविमचे लेखाधिकारी परमेश्वर इंगळे, जिल्हा स्तरीय सुकाणू समितीच्या अध्यक्षा श्रीमती सजीवनी कांबळे,  एकता लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुकुमार दरकसे, सहसचिव श्रीमती मीरा पवार  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

     

  पुढे बोलताना अप्पर जिल्हाधिकरी अरविंद लोखंडे म्हणाले की,  प्रत्येक व्यक्ती आज प्लॅस्टिक बॅगचा सर्रास वापर करतात, मानव निर्मित प्लॅस्टिकच्या अती वापरामुळे मानवासोबतच वन्यजीव व जलजीवांचे पण नुकसान होत आहे. निसर्गातील प्रत्येक घटक हे प्लॅस्टिकमुळे प्रभावित होत आहे,  आज प्लॅस्टिक बॅग मध्ये भाजीपाला, हॉटेल मधील अन्न घेवून जाने यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्या नंतर खराब झालेला भाजीपाला, उर्वरित अन्न हे बाहेर रस्त्यावर व कचऱ्याच्या डब्यात फेकले जाते व तेच अन्न व भाजीपाला गाई खातात त्यासोबत त्या प्लॅस्टिक पण खातात ते इतके घातक असते की त्या मुळे त्या गायीचा मृत्यू पण होतो, त्याच प्रमाणे प्लॅस्टिकच्या अति वापरामुळे नद्यांवाटे हे प्लॅस्टिक प्रचड प्रमाणात समुद्रात पोहचते या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्रजीवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, समुद्रातील अनेक मासे हे यामुळे प्रभावित होत आहे, प्लॅस्टिक पिशव्याचे विघटन होण्यासाठी चारशे ते पाचशे वर्षाचा कालावधी लागतो. पाचशे वर्षे हे असेच राहते, म्हणून  मोठ्या प्रमाणावर हा कचरा आपण निसर्गात जमा करतो. त्यामुळे भविष्यात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, निदान पुढच्या पिढीने याचा विचार करून प्लास्टिक व प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. 


             या प्रसंगी प्रभू जाधव यांनी प्लॅस्टिकच्या अतीवापरामुळे होणारे दुष्परिणाम बाबत उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना सखोल  असे मार्गदर्शन केले. माविम चे जिल्हा समन्वय अधिकरी मनसुर पटेल यांनी आपल्या प्रस्ताविका मध्ये  महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलन राहावे, प्लास्टिक  मुळे निसर्गावर व त्यामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम रोखण्यसाठी राज्यात प्लास्टीक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिला आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून कोविड कालावधीत (लॉकडाउन दरम्यान) जिल्ह्यातील बचत गटातील महिला कडून 20 हजार  कापडी पिशव्या तयार करून घेण्यात आलेल्या आहेत, या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्लास्टीक च्या निर्मूलनासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जणजागृती करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवी व मास्क वाटप करण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे व अशाच प्रकारे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील शासकीस शाळा, महानगर पालिका, नगर पालिकेच्या शाळा, आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या व मास्क चे मोफत वितरण करण्यात येणार असल्याचे आपल्या प्रास्ताविक मध्ये संगितले.     


     या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशवी व मास्क चे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने तीन गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप  करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचलन माविम चे सहायक संनियंत्रण अधिकारी सूर्यकांत वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती  संजीवनी कांबळे यांनी  केले, कार्यक्रम  यशस्वी करण्याकरिता श्री  अनंत  हेरकर , स्वप्नील श्रीगिरी  धनंजय  तांदले, मनीषा  महाजन, सविता पेंढारकर , सुरेंद्र कांबळे इत्यादीने प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या