सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे " आदर्श पत्रकार पुरस्कार "
ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी व सादिक इनामदार यांना जाहिर
पत्रकार दिनानिमित्त डॉक्टरांचा ही सन्मान
सोलापूर - हीरक महोत्सव . साजरा करणारे सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे आदर्शपत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम ६ जानेवारी २०२२ रोजी ११ वाजता ' पत्र महर्षी कै . रंगा अण्णा सभागृह , पत्रकार भवन , विजापूर रोड येथे होणार आहे
यंदाचे पुरस्कार दै . संचार चे माजी उपसंपादक व ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्ही कुलकर्णी , दै पुण्यनगरीचे उपसंपादक सादिक इनामदार यांना .शहर पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या हस्ते व , जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के , पत्रकार संघाचे अशोक मठपती, प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहारे , उघोगपती दत्ता अण्णा सुरवसे, डॉ. सतिश वळसंगकर , प्राचार्य इ. जा. तांबोळी ,यांच्या उपस्थित देण्यात येणार आहे . तसेच कोरना महामारीच्या काळात आपला योगदान देणारे डॉक्टर शार्दूल कुलकर्णी , असिम असद सैफन, डॉ मनिषा काटीकर , डॉ. निसार शब्बीर शेख , यांचा सुध्दा " कोरोना योध्दा " म्हणून सन्मान करण्यात येणार आहेत
या अगोदर हे संस्थेच्यावतीने अरुण बारसकर युसूफ शेख , संजीव पाठक , मुबारक शेख , अभय दिवानजी, प्रशांत जोशी , भरतकुमार मोरे यांना " आदर्श पत्रकार " म्हणुन सन्मानित करण्यात आले होते
यंदाचा पुरस्कार श्री कुलकर्णी व श्री इनामदार यांना जाहिर करण्यात आला आहे . पांच हजार रुपये रोख , प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह , शाल __ बुके असा पुरस्काराचे स्वरूप आहे
पत्रकार . दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे सचिव . प्रा पी . पी . कुलकर्णी , सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी केले आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.