हनुमान मंदीर ते खादी भंडार पर्यंत मुख्य रस्त्यावर दोन तीन ठिकाणी वाल फुटुन पाणि रस्त्यावर जात आहे. त्यास जा ये करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे त्रास दूर करण्यात यावे


हनुमान मंदीर ते खादी भंडार पर्यंत मुख्य रस्त्यावर दोन तीन ठिकाणी वाल फुटुन पाणि रस्त्यावर जात आहे. त्यास जा ये करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे त्रास दूर करण्यात यावे एम आई एम ची मागणी 





औसा शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी सोडून घाण केलेले दुरुस्त करा   एम. आय. एम. च्या वतीने निवेदन करण्यात येते की, औसा शहरातील मुख्य रस्ता बाजारपेठेत बांधकाम सुरु आहे. त्यालगत रस्त्यावर पाणी सोडून शहरातील जनतेला येजा करण्यासाठी त्रास होत आहे. तसेच शहरातील हनुमान मंदीर ते खादी भंडार पर्यंत मुख्य रस्त्यावर दोन तीन ठिकाणी वाल फुटुन पाणि रस्त्यावर जात आहे. त्यास जा ये करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका अद्याप लक्ष देत नाही. व घरकुल योजने अंतर्गत काम करण्यासाठी आपली घरे रिकामे करून लोकांनी रस्त्यावर घरे थाटले आहेत व अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात येत आहे. सर्व शहरातील मुख्य रस्त्यावर होत असलेले घाणीचे साम्राज्य दुरुस्त करण्यात यावे. नगर पालिकेला वारंवाही सुचना देऊनही काम करण्यात येत नाही. तरी सद्या प्रशासक नेमणुक झालेली आहे तरी सन्माननीय मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन रस्त्यावरील पाणी व अतिक्रमण तसेच शहरातील विविध समस्यांवर लक्ष देण्यात यावे व जनतेला होत असलेले त्रास दूर करण्यात यावे असे

सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा यांनी केले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या