पत्रकारांनी माहिती तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा - माहिती अधिकारी युवराज पाटील

 

पत्रकारांनी माहिती तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा - माहिती अधिकारी युवराज पाटील
 



निलंगा: निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर येथे 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व साई क्रिटीकेअर हॉस्पिटल निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने  सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
     
            या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर अरविंद  भातांब्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग लातूरचे जिल्हा माहीती अधिकारी युवराज पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून निटूर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा संगायो समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ सर, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू भैय्या डगवाले, निलंगा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मनसे विद्यार्थी आघाडी लातूर शहराध्यक्ष बालाजी कांबळे जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, आनंदवाडीच्या सरपंच वर्षा विष्णु चामे, गौरचे सरपंच विठ्ठल टोकले, सामाजिक कार्यकर्ते रमेश मोगरगे, पत्रकार राजकुमार सोनी, लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रविकिरण सूर्यवंशी, सचिव दत्तात्रय  जी परळकर, लातूर शहराध्यक्ष अमोल जी घायाळ, किशोर दादा जैन, पंकज जैस्वाल, राजकुमार गुडाप्पे, अरूण हांडे, व्यंकटराव राऊतराव, माधव शिंदे, रमेश शिंदे, गंगाधर डिगोळे, असलम झारेकर आदीसह जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

    डॉक्टर अरविंद जी भातांब्रे साहेब यांनी आपल्या भाषणात रुग्णांनी घ्यावयाची काळजी विविध  रोगामुळे होणारे  परिणाम व उपचार यावर सविस्तर  मार्गदर्शन केले. या शिबिरात 110 रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात रुग्णांची व्यवस्थित तपासणी करून रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.

            या शिबिरातील तज्ञ डॉक्टर  राजशेखर मेनगुले (एम .डी मेडिसिन साई क्रिटीकेअर हॉस्पिटल निलंगा ) संदीप बिराजदार( औषध अधिकारी लातूर)राहुल गावकरे, गफूर येरोळे, शुभम जटाळे अभिषेक यांनी तपासणी करून औषध उपचार केले.
 हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञानोबा चामे, विष्णू चामे, रवि चामे व गुराळे श्रीराम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या