:: एमआयडीसी पोलीसांची अ.मृ.चे तपासामध्ये खुन झाल्याचे उघड करुन धडक कार्यवाही ::
पो.स्टे. एमआयडीसी हद्दीतील मौजे भुईसमुदर्गा, ता.जि. लातुर येथे दि.१९/१२/२०२१ रोजी रात्री इसम नामे ऋषीकेश रामकिशन पवार, वय २९ वर्ष, रा. भुईसमुदर्गा हा त्याचे शेतातील आखाडयामध्ये जळुन मयत झाल्याची खबरेवरून पो.स्टे. ला अ.मृ.नं. २८४/२०२९ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे अमृ.दाखल झाला होता.
सदर अ.मृ.चे घटनास्थळावर मा. वरीष्ठ पोलीस अधिकारी मा.श्री अनुराज जैन, अपर पोलीस अधीक्षक साहेब, लातुर व मा. श्री जितेंद्र जगदाळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, उपविभाग, लातुर शहर, श्री संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. एमआयडीसी, लातुर यांनी भेट दिली. घटनास्थळावर तपासाचे दृष्टीने मा. वरीष्ठांनी तपासाबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या. त्यानुसार संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक, सोबत श्री संदीप कराड पोउपनिरीक्षक, पोना/ २०७३ दरेकर, पोना/ ९३३ वायगावकर, पोना / ९२२ मालवदे यांनी अ.मृ.चे तपासात सुरुवात केली. मयत हा घटनेच्या दिवशी कोणासोबत होता या दृष्टीने पो.स्टे. एमआयडीसी येथील पोलीसांनी बारकाईने तपास केला त्याबाबत कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन आला नाही. तसेच सदरचा मयत हा आगीमध्ये जळुन खाक झाल्याने सदरचा घातपात आहे किंवा अपघात आहे याबाबत तर्कवितर्क व चर्चा ग्रामस्थामध्ये होती. त्या पार्श्वभुमीवर एमआयडीसी पोलीसांनी अत्यंत संयमाने व तांत्रिक दृष्या तपास करुन पुरावे गोळा केले व प्राप्त गोपनिय माहितीचे संकलन करून तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल चॅटींग, मोबाईल लोकेशन, कॉल्स याबाजुने बारकाईने तपास करुन सदर मयत ऋषीकेश रामकिशन पवार याचा खुन झाल्याचा उलगडा झाला. दि.१९/१२/२०२९ रोजी मयत ऋषीकेश रामकिशन पवार याचे शेतातील आखाडयावर त्याचे गावातील त्याचा मेहुणा रणजीत विजयकुमार देशमुख व चुलत भाऊ गोविंद नागोराव पवार हे दारु पिऊन मटनाचे जेवण केल्यानंतर आरोपी गोविंद पवार यांने मयत ऋषीकेश यास तु लई माजलास का? तु माझे भावजयीला मोबाईलवर का बोलतोस असे म्हणुन वादावादी करुन आरोपी गोविंद नागोराव पवार याने दाताळाने (शेती अवजार) मयताचे डोक्यात मारले. मयत ऋषीकेश हा बेशुध्द पडल्यानंतर त्यास गोविंद पवार व रणजित देशमुख यांने बाजेवर झोपवुन त्यावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व पायी घराकडे गेले. सदर गुन्हयाची कबुली आरोपीने दिलेली आहे.
सदर अ.मृ.चे तपासात मा.श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक साहेब, लातुर, मा.श्री अनुराज जैन, अपर पोलील अधीक्षक साहेब लातुर, मा.श्री जितेंद्र जगदाळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, उपविभाग, लातुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. एमआयडीसी, लातुर येथील संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक, सोबत श्री संदीप कराड, पोउपनिरीक्षक, पोहेकॉ/६९३ बेल्लाळे, पोना/६१० राजपुत, पोना/ १४५२ ओगले, पोना/ २०७३ दरेकर, पोना/ ९३३ वायगावकर, पोना / ९२२ मालवदे, पोशि/१८९४ जाधव यांनी नमुद अ.मृ.मध्ये कसुन तपास करुन व गुप्त माहिती काढून गुन्हा उघडकीस आणला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.