तावरजा प्रकल्पासाठी ४१.६४ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी कालवा समिती व विधिमंडळात आ. अभिमन्यू पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.

 तावरजा प्रकल्पासाठी ४१.६४ कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी

कालवा समिती व विधिमंडळात आ. अभिमन्यू पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश.








औसा - आमदार अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून व तत्कालीन आमदार त्र्यंबक भिसे यांच्या तारांकित प्रश्नामुळे तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तावरजा प्रकल्प दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. कोरोनामुळे या कामाला मंजुरी मिळण्यासाठी उशीर होत असल्याने आ. अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता व कपात सूचना मांडत.कालवा समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून पाठपुरावा केला होता.या पाठपुरव्यास यश आले असून तावरजा प्रकल्पासाठी ४१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. 



                  तावरजा प्रकल्प सांडव्यावर २०१८ मध्ये तात्पुरत्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते पण त्यानंतर केलेल्या तांत्रिक पाहणीत पाण्याची गळती रोखण्यात यश आले नसल्याचे लक्षात आले.प्रकल्पाच्या व्दारामधून ३० ते ३५ टक्के पाणी वाहून जात असल्याने प्रकल्पात पुर्ण क्षमतेने जलसाठा होत नाही.या कारणाने होणारे नुकसान पाहाता अस्तित्वात असलेली स्वयंचलित दरवाजांच्या जागेवर उचलद्वारे बसविण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली. २०१७ हिवाळी अधिवेशनात लातूर ग्रामीण चे तत्कालीन आमदार त्र्यंबक भिसे यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या आधारावर व आमदार अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तावरजा प्रकल्प दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. मे २०२० मध्ये सदरील कामाचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कोरोनामुळे सदरील कामाला मंजुरी मिळण्यासाठी उशीर होत असल्याने आ. अभिमन्यू पवार यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता व कपात सूचनाही मांडली होती. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता.केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून तावरजा प्रकल्प सांडव्यावर उभे उचलद्वार बसवणे व माती धरण दुरीस्तीकाम करणेसाठी ४१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.औसा शहर व अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना याच प्रकल्पावर निर्भर आहेत,सदरील कामामुळे पाणीसाठा जमा होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागायला मदत होणार आहे.





                   तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विद्यमान जलसंपदामंत्री जयंत पाटील व लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे या मंजुरीसाठी आ. अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत. औसा शहर व अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना याच प्रकल्पावर निर्भर आहेत, दुरुस्तीमुळे अपेक्षित पाणीसाठा जमा होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागायला मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या