राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी:आपल्या कामगिरीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणारे लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
'सदरक्षणाय खल निग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची कारकीर्द राहिलेली आहे.लातूर जिल्ह्यात बऱ्याच काळापर्यंत त्यांनी काम केलेले आहे.प्रत्येक ठिकाणी भातलवंडे यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे.या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची परंपरा आहे.येथे पोलीस अधीक्षक असणारे संजय लाठकर यांनाही यावर्षीच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी भातलवंडे यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला,त्यांचे अभिनंदन केले.भातलवंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच शांत व सुसंस्कृत जिल्हा ही लातूरची ओळख कायम असल्याचे तिरुके यावेळी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी जिपच्या कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनिषा चामे,रामकिसन फड,वरिष्ठ सहाय्यक डी.एन.बरुरे,सतिश कोटमाळे,इस्माईल पठाण, ॲड.आदिनाथ नवटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.