शिक्षण व हिजाब भारतीय संस्कृति कशी आहे याचे अवलोकन करावे

 ✍️✍️✍️लेखन प्रपंच...✍️✍️✍️




शिक्षण (Education) हा सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा कणा आहे असे म्हणतात व आहेपण. परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापुर्वी शिक्षणाच्या विविध पद्धति आपन वेगवेगळ्या ग्रंथातुन, पुस्तकातुन अभ्यासले आहेत. शिक्षणामध्ये आई,वडिल हे घरची लोकं प्राथमिक स्वरुपात आपले गुरु असतात हे आपणास माहिती आहे. प्राचीन काळी शिक्षण घ्यायचे म्हटले तर घरातुन आई वडील, मंदीरात, मठात, मदरशात त्याची सोय होती व आजपण आहेच परंतु जशी जशी यात सुधारणा होत गेली तसं यात बदल करने क्रमप्राप्त झाले. शिक्षणासाठी खास व्यक्ति नेमण्याची पद्धत राजे महाराजे आपल्या हद्दीतील काही ज़मीन दान देण्याची उदाहरणे आपणाला आठवतात परंतु त्याकाळी सर्वांना शिक्षण घेण्याची मुभा होती का? हा सर्वांत महत्त्वपूर्ण प्रश्न निर्मान होतो. म्हणतात ना "God made man, man made cast, cast destroyed the world ".हा विचार घर करु लागला. ब्राह्मण, क्षत्रीय,वैश्य व शुद्र अशी त्यांच्या कामावरुन उतरंडाची निर्मीती झाली. ब्राह्मणांनी शिकायचे व राजांना निर्णय घेण्यास भाग पाडायचे मग ते प्रजेसाठी फायद्याचे असोत किंवा वैयक्तिक फायद्याचे.क्षत्रीय यांनी फक्त लढण्याचे काम करायचे शिक्षणापासुन यांचा दुर दुरचा संबध नाही.वैश्याने फक्त कारभार पाहायचे तर शुद्रांनी यांचे राहिलेले राज्याची पडीक काम करायचं असा नियम तयार झाला म्हणन्यापेक्षा करुन ठेवण्यात आला. फक्त उच्चभ्रु लोकांनी ज्ञाणर्जन करण्याची प्रथा राजाच्या बाजुला असलेल्या नारदांनी व बगलबच्च्यांनी तयार केली. त्यानुसार दुसर्या  कोणत्या व्यक्तिने त्यातल्या त्यात शुद्रांनी तर शिक्षण घेवुच नये हा नियम तयार झाला.ज्या ज्या वेळेस एकलव्य तयार झाला त्या त्या वेळेस द्रोणाचार्य प्रकट झाले आणि अंगठा मागितला हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर नेहमी पुस्तकाच्या व ग्रंथाच्या माध्यमातुन उपलब्ध आहेत. शुद्रांनी शिक्षण घेण्याचे ठरवले तर जीभ कापने, कानात शिसे भरणे असे कितीतरी अघोरी प्रकाराचे पण उदाहरणे आपल्या समोर आहेत.  शिक्षणासाठी धडपड करणारे समाजसुधारक मग त्यात राजा राममोहन राय, सर सय्यद अहमद खाँ, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले ,शाहु महाराज,फातिमा शेख असे अनेक कितीतरी समाजसुधारकासोबत उच्चभ्रु लोकांनी काय केले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

 आज २१ व्या शतकात आपन जगाच्या पाठीवर महासत्ता बनण्याची स्वप्ने पहात आहोत परंतु महासत्ता बनण्यापर्वी समाजकंटकाचे समुळ उच्चाटन झाले आहे का? संकुचित विचारसरणी संपली आहे का?जातियवादाची मुळे खोलात पसरलेली आहेत का? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. शिक्षण हा संविधानाने दिलेला मुलभुत हक्क आहे. त्याच बरोबर आपन काय खावे, आपन काय बोलावे, आपन कोणती पोशाख वापरावेत ह्याचे स्वातंत्र्य सुद्धा संविधानाने सर्व लोकांना बहाल केले आहे. संविधानाची सुरुवातचं आम्ही भारताचे लोक म्हणुन करण्यात आली आहे.भारतीय संस्कृतीचा सर्व जगात बोलबाला आहे. पाश्चिमात्य लोक सुध्धा भारतीय पोशाख व संस्कृति स्विकारण्यास पुढे येत आहेत आणि आपन आपली संस्कृति Modernisation च्या विळख्यात आपल्या आया ,बहीनीचे कपडे कमी करण्यात धन्यता व विकास अशा गोडगैरसमजात वावरत आहोत.आपल्या संस्कृति चे आचार व विचार जसे महत्त्वाचे तसेच पोशाख सुद्धा महत्वाचे आहेत.शिकागो परिषदेत जेव्हां स्वामी विवेकानंद गेले त्यावेळी गोरे लोक त्यांच्यावर हसु लागले कोण हा व्यक्ति? हा काय बोलणार? कसा हा पोशाख? असे प्रश्न करु लागले परंतु "इथे बसलेल्या माझ्या बंधु आणि भगिनींनो" हे वाक्य ऎकताच जे हसु लागले होते तेच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करु लागले हे आपन वाचलो आहोत. कित्येक परिषदा पंच्यावर महात्मा गाँधी यांनी केल्या आहेत त्यांना पण हिणवण्यात आले परंतु आपल्या आचारांनी व विचारांनी त्यांनी सर्वांची मने जिंकली अशी किततरी उदाहरणे आपल्याला देता येतील. शिक्षण हि प्रणाली मुळातच चार स्तंभावर टिकुन राहते असे माझे मत आहे.Education means the formula of E4. 1) Excellence (उत्कृष्ठता) 2) Expansion (प्रसार) 3) Effort (प्रयास) 4) Equity (समानता) हे चार स्तंभ शिक्षणाला प्रमोच्च बिंदुपर्यंत घेवुन जातात परंतु या चार स्तंभामध्ये उत्कृष्ठता,प्रसारण व प्रयास  तीन स्तभांवर आपन लक्ष देतो परंतु ४ थ्या स्तंभाचे काय? शिक्षणाप्रती समानता (equity) हा सुद्धा महत्वाचा स्तंभ आहे. एकीकडे "बेटी पढ़ाव व बेटी बचाव" बाता मारायचे, मोठे मोठे होर्डींग्ज लावायचे व दुसरी कडे हिजाब घातला म्हणुन मुलिंना शिक्षण घेण्यास व विद्यालयात येण्यास मज्जाव करायचे ही कोणती समानता? ह्याला तर समानता म्हणता येणार नाही हा तर फक्त आणि फक्त एका समाजाप्रती असणारा द्वेष आहे. हिजाब आणि शिक्षणाचा दुर दुरवरचा संबध नाही परंतु काही समाजकंटक, जातियवादाचे किडे, बुसरसलेली मानसिकता असणारी सरकार, विशिष्ट मुलिंबद्दल आकस ठेवणारी शिक्षणप्रणाली यावर लगेच भाष्य देण्यास तयार होतात. शिक्षणाचा प्रसार व प्रचार होने महत्त्वाचे आहे ते कोण घेतोय? त्याने कोणता पोशाख परिधान केला आहे? तो कोणत्या विशिष्ट जातीचा आहे का? ही गोष्ट शिक्षणप्रणालीत मान्य नसायला हवी. काही दिवसापासुन शेजारिल राज्य कर्नाटक मध्ये हिजाब घालुन येणार्या मुस्लिम तरुनींवर त्या विद्यालयातील प्रशासनाने बंदी घातली फक्त बंदीच घातली नाही विद्यालयाच्या गेट च्या बाहेर त्यांना हकलुन देण्यात आले त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले ही समानता नसुन द्वेष आहे आणि याचे परिणाम येणार्या पिढींना भोगावे लागणार आहेत. लिहण्याचे,बोलण्याचे,वक्तव्य करण्याचे ,खाण्याचे ,पिण्याचे , पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमुद केले आहेत. ह्या गोष्टींचा नेहमी नेहमी या लोकांना विसर का पडतॊ हा सुद्धा एक प्रश्न आहे.हिजाब घालणार्या मुली कलेक्टर, आय पी एस, पायलट, आय एफ एस ,वैज्ञानिक, मंत्री होवु शकत नाहीत का? हिजाब मुळे ते शिक्षणात मागे राहतील का? हिजाब घातल्यामुळे आपल्या विद्यालयाची प्रतिष्ठा जाणार का? हिजाब घातल्यामुळे अनर्थ परिणाम उद्भवणार का? हिजाब घातल्यामुळे मुलींची सुंदरता नष्ट होणार का? हिजाब घातल्यामुळे अध्यापकाला शिक्षण देताना व घेताना आडथळे येणार का? असे कितीतरी प्रश्न उपस्थित राहतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरे नाही असेच आहे.

 भारतीय संस्कृति व परंपरा हिजाबचीच आहे हे या बिनडोक्यांना कोन समजावुन सांगिल. आज सुद्धा राजस्थान व गुजरात या राज्यातील लोक, महिला पदर डोक्यावरुन खाली पडु देत नाहीत की आपल्या पेक्षा वडिलधार्या व्यक्ति समोर बिन पदराच्या थांबत सुद्धा नाहीत.ही गोष्ट आपन सर्वांनी जानली पाहिजे. ज्या राज्यामध्ये मनुवाद्यांचे सरकार आहेत त्या राज्यात असली उदाहरणें पाहण्यास या आठ वर्षापासुन सर्रास वाढ पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी सोलापुर येथील एका मुलींने एका सुटची निर्मिती केली काही उपकरणाच्या साह्याने ते सुट त्याने तयार केले कोणी अनोळखी व्यक्ति आपला एकांतात पाठलाग करत असेल तर त्या सुट द्वारे आपन पोलिस किंवा आपल्या आईवडिलांना आपले लोकेशन पाठवु शकतो असं त्यात नियोजन केले आहे व कोणी व्यक्ति एकांतात छेडछाड करित असेल तर त्या व्यक्ति ला त्या सुटमुळे शाॅक बसेल अशी निर्मिती करण्यात आली या ठिकाणी हे सांगायचे उद्देश फक्त एवढेच की  तो सुट बनवण्याची वेळ आली का आली? का बलात्कारांना व छेडछाडींना चालना मिळाली? मुल्य शिक्षणाचां र्हास झाला का? ह्या प्रकरणात अंगप्रर्दशन जबाबदार आहेत का? माॅडर्नाझेशन च्या नावाखाली किती मुली व महिला बाहेरख्याली आहेत का? किती नवीन मुलींची कुंटणखाण्यात रवानगी ह्या टोळ्यामार्फत होते? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उपस्थित राहतात व समाजामध्ये बदनामी होते हे तर वेगळेच आहे. आपन फक्त मुंबई,पुणे ह्या नगरातील कुंटणखण्याचीच चर्चा करतो परंतु हेच कुंटनखाने आता आपल्या जिल्ह्यापर्यंत व हाय प्रोफाईल सोसायटी पर्यंत आले आहेत त्याचे काय? मला आजपण आठवतेय अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांनी मुलिनां अंगभरुन कपडे घालण्याचा संदेश दिला होता. जर हिजाब मध्ये शिक्षण घेणे आपणांस धार्मिक कट्टरता वाटत असेल तर आपल्या अशा बुरसटलेल्या विचारांची किव करण्याशिवाय दुसरे गत्यतंर नाही. ज्यांना हिजाब घालने,पुर्ण अंगभरुन कपडे घालने हा परंपरागत पोशाख वाटत असेल तर त्यांनी खुशाल आपल्या आई, बहीन, बायको यांना  जिन्स पँन्ट,स्कर्ट,टाॅप,बिकनी,टि शर्ट या पाश्चिमात्य पोशाखात रॅम्प वाॅक करवावा व शरीराचे एक एक अंग दाखवावे किंवा शाळा महाविद्यालयात पाठवावे त्यांना कोणी मज्जाव केला आहे का?. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे परंतु शेवटी त्यांनी भारतीय संस्कृति कशी आहे याचे अवलोकन करावे हीच प्रार्थना... जय जिजाऊ,जय सावित्री, जय फातिमा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या