शासन योजनेच्या नावाखाली औसा शहरात होत असलेले अतिक्रमण काढा:एम आय एम ची मागणी
औसा / प्रतिनिधी -
औसा शहरातील विविध भागातील शासनाच्या योजनांच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण काढा. या मागणीचे निवेदन एम आय एम च्या वतीने औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे औसा शहरातील विविध भागातील शासनाच्या योजनांच्या नावाखाली आहेत. शहरात होणाऱ्या अतिक्रमणे काढण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनास एम आय एम च्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन
निदर्शनास आणून ही शहरातील विविध भागातील अतिक्रमणे काढण्यात आली नाही व याबाबत कसलीच कारवाई झाली नाही.
शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच शहरातील विविध प्रभागातील भागांमध्ये घरकुल व शौचालयाच्या नावाखाली वाढते अतिक्रमणे करून खुल्या जागा बळकावण्यासाठी प्रयत्न चालू
सिटीसर्वे व भूमी अभिलेख कार्यालयात शहरातील मूळ जागांची नोंद असलेल्या जागांपैकी अतिक्रमणे
करून शहरात खुल्या जागा बळकावण्याचा प्रयत्न चालू त्यास आपल्या प्रशासना मार्फत शहरातील अतिक्रमणे काढून शहरातील जनतेस होणारा त्रास दूर करण्यात यावा अन्यथा एम आय एम च्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनावर सय्यद मुजफ्फर इनामदार यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.