देवणीच्या मामाची ग्रेट भेट...

 देवणीच्या मामाची ग्रेट भेट....





      साहेब टोपली घ्या.. बुडाची देऊ का बिनबुडाची... वय 75+ पण मेहनत करून बनविलेले टोपली जवळपास 25 ते 30 पाठीवर घेऊन रस्त्याने फिरणारे बाबा यांची मी 

आफीससकडे जाताना भेट झाली आणि सुरू झाले गप्पा.. 

बुडाची टोपली भाकरी ठेवायला कामाला येईल आणि बिनबुडा ची भाजी ठेवायला कामाला येईल..दोन्ही घ्या..मी मामाकडे बघतच राहिलो..आणि विचार केला..श्रीमंती कुणाला म्हणायची..ती मला मामाच्या चेहऱ्यात आणि त्यांच्या बोलण्यात दिसून आली..तो आनंद आणि तो आत्मविश्वास पाहून मी थकच्च झालो..टोपली घेतली..देताना मामा गळ्याला लाऊन सांगायचे विसरले नाहीत..साहेब कधी देवणीला आलो तर भेटून चहा घेऊन जावा..

      आज आपल्या देशात जातीयतेचे विष पसरविण्याचे काम चालू असताना मामांची झालेली भेट मला एक गोष्ट सांगून गेली.. जातीच्या पलीकडे काय श्रेष्ठ आहे..? तर माणुसकी आणि जो पर्यंत मामा सारखे लोक या जगात आहेत ती कायम श्रेष्ठच राहणार..कारण मामांनी मला माझी जात नाही विचारली आणि मी मामांची जात नाही विचारली...

   मामा..छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला तुम्हाला भेटून निघताना आपल्या दोघांच्या चेहऱ्यावर जे समाधान मला दिसले...ते शब्दात वर्णन न करता येण्यासारखे होते.. धन्यवाद मामा...

-डॉ.आर.आर.शेख(तालुका आरोग्य अधिकारी,औसा.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या