*छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी वाहनांचे सायलेन्सर काढून फिरणाऱ्या वाहनाचे फोटो काढून त्यांच्यावर नंतर कारवाई करण्याच्या पोलिस अधीक्षकांच्या सर्व पोलिसांना सूचना.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश्य सायलेन्सर, मॉडीफाय सायलेन्सर लावून अथवा सायलेन्सर काढून मिरवणाऱ्या वाहनांचे फोटो काढून त्यांच्यावर नंतर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिसांना दिले आहेत.
उदईक रोजी जो कोणी वाहनचालक त्याचे ताब्यातील वाहनाचे सायलेन्सर काढून, मॉडीफाय सायलेन्सर वापरून नियमबाह्य वर्तन करतील अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्य नियमांचे पालन करून सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले आहे. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करावे. छत्रपती शिवरायांच्या गरिमेला धक्का लावतील असे कुठलेही कृत्य करू नये.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.