‘आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच’, मलिकांच्या ईडी चौकशीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच’, मलिकांच्या ईडी चौकशीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया



मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी पहाटे जाऊन ईडीनं (Enforcement Directorate) जी कारवाई केली, त्यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar on Nawab Malik’s ED inquiry) यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता, आता काय बोलयाचं यावर.. यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत., त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणालेत. कशाची केस काढली त्यांनी..? एक साधी गोष्ट आहे, साधा कार्यकर्ता असला, की दाऊदचं नाव घ्यायचं, आणि अडकवायचं, असले प्रकार सुरु आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.


‘तुम्हाला माहीत नसेल कदाचित.. तुम्ही लहान असाल तेव्हा… त्या काळात माझ्यावरही असाच आरोप झाला होता.. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो.. याला आता 25-एक वर्ष झाली.. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं… जे लोकं भूमिका केंद्राच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रसा देण्याचा प्रयत्न आहे…’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

बुधवारी सकाळी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. इकबाल कासकर यांनी मलिकांचं नाव घेतल्यामुळे त्यांना ईडीनं चौकशीसाठी नेल्याचं सूत्रांनी म्हटलंय. याप्रकरणी सकाळी पावणे आठ वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना नोटीस न देतो, समन्स न बजावता त्यांच्यावर ईडीनं अशाप्रकारे कारवाई केली गेली असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलं जात आहे. सध्या मुंबई ईडी कार्यालयात त्यांची चौकशी आहे. जमीन मालमत्तेशी संबंधित गैरव्यवहाराचं प्रकरण असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 1993 खटल्यातील आरोपीकडून मलिकांच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी झाल्याचाही आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या