मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला चालू अधिवेशनात 500 कोटीचे निधी मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्रीनां निवेदन..
एस ए काज़ी
औसा / प्रतिनिधी :-मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला चालू अधिवेशनात शैक्षणिक व व्यवसायासाठी 500 कोटीचे निधी मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री, व अर्थमंत्रीना निवेदन सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्यातर्फे देण्यात आले आहे.
गेल्या आठ वर्षापासुन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सर्व योजना बंद आहेत ते सुरु करण्यात यावेत. शैक्षणिक व्यवसायासाठी चालू अधिवेशनात थेट 500 कोटींची रुपयांची निधीची तरतूद करण्यात यावी व थेट कर्ज नव्याने सुरु करण्यात यावे. शैक्षणिक व व्यवसायासाठी प्रत्येकी विनाअट दोन लाख कर्ज वाटप करण्यात यावे, कोरोना काळात व्यापारी व विद्यार्थी चे जास्त नुकसान झाले आहे ते नुकसान भरून यासाठी योग्य ते उपाययोजना करण्यात याव्यात. त्याकरीता आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात. -
मौलाना आझाद महामंडळला 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 15 कलमी अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जिल्हा नियोजन बैठकीत आढावा घेण्यात यावा, मौलाना आझाद महामंडळाची कार्यकारणी तयार करण्यात यावी व अल्पसंख्यांक आयोग स्थापन करण्यात यावे, अल्पसंख्यांक बहुल शहराचा निधी मागील 8 वर्षापासुन देण्यात आलेला नाही. तो तात्काळ देण्यात यावा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शैक्षणिक व बिन व्याजी भांडवल, वाहनकर्ज योजनाच्या माध्यमातून थेट कर्ज वाटप करण्यात यावेत, तरी आमच्या मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात. अन्यथा एमआयएमच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद केले आहे. यावेळी एमआयएमचे ॲड.गफरुल्ला हाश्मी, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, ॲड. आर एम शेख फारुख काज़ी अज़हर कुरेशी सय्यद फज़ले रहीम हारून खां पठाण शेख नय्यूम शेख अलीम शेख मुखिद यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.