प्रतिनिधी समीर तांबोळी
*यशबांतबाबा यात्रा यंदातरी कोरोना निर्बंधाविना पार पडणार का* ?
ग्रामस्थ व भाविकांच्याता *उत्सूकता*
मायणी गावातील यशवंतबाबा यात्रेचा पंधरवडा गेल्या अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांसाठी मोठ्या उत्साहाचा व करमणुकीतुन वर्षानुवर्षे पार पडत आला आहे.परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासनाकडून सार्वजनिक सर्वच निर्बंध घालण्यात आले होते.चालुवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी कोरोनाचे निर्बंध यशवंतबाबा यात्रेत शिथिल होऊन धार्मिक विधी ,रथोत्सवसह करमणुकीचे कार्यक्रम पार पडणार का ? याची कमालीची उत्सुकता पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भविकांमध्ये आहे.
मायणी गावातील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ रिंगवन यात्रा,यशवंतबाबा यात्रा,श्रीसंत सरुताई रथोत्सव,श्री धनगर विठोबा यात्रा या सर्व देवस्थानच्या यात्रा वर्षभरात होत असतात. या यात्रांच्या निमित्ताने धार्मिक विधी, करमणुकीचे कार्यक्रम याचे मोठे कुतूहल महिला व आबालवृद्धांमध्ये असते. सन २०२० मध्ये मार्च-एप्रिलमध्ये होऊ घातलेली यात्रा कोरोनाच्या आगमनामुळे रद्द करावी लागली होती.यामुळे यात्रेच्या निमित्ताने आलेले करमणुकीचे पाळणे व इतर साहित्य लॉकडाऊनमुळे अनेक महिने जागेवरच पडून होते.या लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. सन२०२१ च्या यशवंतबाबा यात्रेतही कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला परंतु संभाव्य धोका टाळण्यासाठी पुन्हा याही वर्षीची ही मोठी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागली होती.
*यात्रेच्या निमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल ठप्प*
गावातील पंधरवडा चालणारी ही यात्रा गावातील व्यापारीवर्गच नाही तर अनेक ठिकाणाहून आलेल्या व्यवसायासायांसाठी आलेले छोटे मोठे व्यापारी, याठिकाणी भरणारा मोठा जनावरांचे प्रदर्शन व बाजार यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. गेल्या दोन वर्षांपासून ठप्प असणाऱ्या या यात्रेमुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या या छोट्या मोठ्या व्यापारी व गावातील रहाटगाड्याला यावर्षी तरी प्रशासनाकडून दिलासा देण्यात यावा अशी मागणी व्यापारिवर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.
आमचा व्यवसाय स्थिर नसल्यामुळे गावोगावच्या यात्रांमध्ये सहभागी होताना प्रत्येक वेळी दुकान थाटाने,काढून दुरारीकडे नेणे यात आमचा बराचसा वेळ,श्रम व आर्थिक ताकत खर्च करावी लागते, यात गत दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटातून आम्ही पुन्हा आता कर्जाच्या बोजातून आपला व्यवसाय उभा करण्यासाठी धडपड करतो आहे.यावर्षी मायबाप सरकार ने आम्हाला आपला व्यवसाय मुक्तपणे पण काळजी घेऊन करण्याची परवानगी दिली तर आमची झालेली फरफट थांबून आम्ही आर्थिक कोंडीतून बाहेर पडू - निलेश कांबळे,व्यापारी .
यात्रेत दुकान थाटलेले व्यापारी.मूळ गाव नातपुते,जि-सोलापूर
*यात्रेसंबंधी गावामध्ये बैठकीचे नियोजन*
श्रीसंत यशवंतबाबा महाराज यांच्या यात्रेसंबंधी जि प सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतबाबा देवस्थान ट्रस्ट यांची नियोजन बैठक उद्या दि-१६ मार्च रोजी पार पडणार आहे.
(आकाश पाळणा व इतर यात्रेतील दुकाने यांचा संग्रही फोटो)
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.