*शिंदाळा येथील ६० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद*
*लातूर जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होत असल्याच्या निमित्ताने मनस्वी आनंद*
*ना. अमित विलासराव देशमुख*
*लातूर जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होत असल्याच्या निमित्ताने मनस्वी आनंद*
*ना. अमित विलासराव देशमुख*
लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात ५७७ मेगावॅट वीज निर्मिती करणारे कांही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले आहे. यात लातूर जिल्ह्यातील सिंदाळा येथील ६० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. यानिमित्ताने २०० ते २५० कोटी रुपये गुंतवणूक असलेला मराठवाड्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लागल्याचे समाधान असल्याचे सांगून यानिमित्ताने लातूरकरांची स्वप्नपूर्ती झाल्याची प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भाने बोलताना ना. अमित देशमुख यांनी म्हटले आहे की केंद्रात अवजड उद्योग मंत्री असताना आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी भेल आणि महाजनको यांच्या संयुक्त विद्यमाने औसा तालुक्यातील शिंदाळा परिसरात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता. महाजनकोच्या माध्यमातून यासाठी जमीनही खरेदी करण्यात आली होती, मात्र केंद्रात झालेले सत्तांतर व इतर कारणाने तेव्हा तो प्रकल्प आकार घेऊ शकला नाही त्यानंतर या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठीची प्रक्रिया गेली अनेक वर्ष सुरु आहे, आज अखेर या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
कोरोना महामारी च्या संकटामुळे मागची दोन वर्ष राज्यातील आणि देशातील विकास प्रक्रिया मंदावली होती. कोरोना चा प्रादुर्भाव आत्ता नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील विकास प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार तसेच महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून राज्याच्या विकासाला गती देणाऱ्या अनेक योजना आजच्या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत. कृषी. उद्योग. शिक्षण यासह सर्वच क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचे जाहीर करताना राज्याच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वीज निर्मितीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. थेट शासकीय गुंतवणुकीतून राज्यात ५७७ मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शिंदाळा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव, धुळे जिल्ह्यातील साक्री त्याचबरोबर वाशिम. चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शिंदाळा येथे ११७ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प आकार घेणार असून त्यासाठी २१० ते २५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यासाठी वीज कनेक्टिविटी कंत्राटदार नियुक्ती यासह सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आलेले आहेत, आता शेवटी त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाल्याने लातूरकरांचे स्वप्न साकार होणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद झाल्यामुळे प्रकल्प उभारणीचे काम लगेच सुरु होईल अशी माहिती महाजनकोचे कार्यकारी अभियंता श्री गुणाले व महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.