*माणूस म्हणून जगण्यासाठी स्त्रियांना शिक्षण आवश्यक -
महिला दिना निमित नजीर मुन्शी यांचे
प्रतिपादन
सोलापूर
संविधानाने महिलांना हक्क व कर्तव्य दिली मात्र त्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. राष्ट्राच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक असून माणूस म्हणून जगण्याची ताकद त्यामुळे मिळते म्हणून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांना शिक्षण देण्याची मानसिकता असावी असे प्रतिपादन नूर शैक्षणिक फाऊंडेशनचे संस्थापक नजीर मुन्शी यांनी काढले सोशल महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, ते पुढे म्हणाले - सोशलच्या गरीब व होतकरु मुला-मुलींना नूर सोशल वेल्फेर ट्रस्ट च्या वतीने गणवेश व स्कॉलरशीप देण्याचे जाहिर केले , व विशेषतः मुलींनी उच्च शिक्षणकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ इ.जा तांबोळी होते मंचावर नगरसेविका वाहिदा भंडाले डॉ. नभा काकडे ,डॉ.दीपक नारायणकर डॉ ए ए गढवाल होते कार्यक्रमाचे स्वागत डॉ.ए ए गढवाल यांनी केले,प्रास्ताविक प्रा. राईसा मिर्झा यांनी केले तर आभार खानसा मुच्चले मानले सूत्रसंचालन प्रा निखत शेख यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.