समाजकारणातून राजकारणाच्या संकल्पक सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले असून महिलांच्या कर्तबगारीकडे समाजाने कधीही पाहिलेले नाही. ज्यांनी भारताची उज्ज्वल परंपरा भारतीय संस्कृती पाळण्यात आयुष्य वेचले विकासात अग्रेसर राहिल्या त्या महिलावर्गाला समाजात मान,प्रतिष्ठा देण्यात कधीही धन्यता मानली नाही. ज्या महिलांच्या शक्तीमुळे, कार्यामुळे कुटुंबसंस्था एकसंघ व टिकून आहे. प्रेम,वात्सल्य, करूणा ज्यांच्या अंगात आहे. अशा महिलांना प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचे प्रभावी कार्य प्रतिभाताईंनी केले. तसेच महिलांनी घराबाहेर पडून प्रत्येक सामाजिक कार्यात, निर्णयात सहभागी होण्याचे क्रांतीकारी धोरणही त्यांनी राबविले. अशा लातूर जिल्ह्यातील विशेषतः लातूर शहर व ग्रामीणच्या प्रतिभावंत, प्रतिभासंपन्न महिला नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व ऑल इंडिया लिनेस क्लबच्या विदर्भ, खानदेश व मराठवाड्याच्या प्रांतपाल सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचे समग्र राजकीय, सामाजिक कार्य निश्चितच महिलांना क्रांती व प्रेरणा देणारे ठरलेले आहे.
प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचा जन्म(रावणगाव ता.भोकर जि.नांदेड) या गावी हिंदू-मराठा कुटुंबात 1 जून 1970 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्ये झाले. लहानपणापासूनच घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही भूमिका लक्षात घेवून प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी जेएसपीएम संस्था, ऑल इंडिया लिनेस क्लब, एम.एन.एस.बँक व उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून समाजकार्याला सुरूवात केली. त्या कार्याची पावती त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाली. पहिल्याच टर्ममध्ये महिला बालकल्याण सभापती व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना 2014 मध्ये मिळाली. लातूर जिल्हा परिषदेची स्थापना 16 ऑगस्ट 1982 साली झाली असली तरीही जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर तब्बल 22 वर्षांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी प्रतिभाताईंना सहजपणे मिळाली. सर्वसामान्यांसह समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचून त्या-त्या व्यक्तीला, घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे 58 गण 10 पंचायत समित्या व 784 ग्रामपंचायतीच्या विकासाला जास्तीत-जास्त विकासनिधी मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम केले. जिल्ह्यातील नेत्यांचे मार्गदर्शन जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, अधिकार्यांच्या पुढाकारातून लातूर जिल्हा परिषदेला यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी राष्ट्रीय स्तरावरील 50 लाखाचे पहिले पारितोषिक तत्कालिन केंद्रीय ग्रामविकास मंत्री मा.ना.विरेंद्रसिंह चौधरी यांच्याहस्ते दिल्ली येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. याच उत्कृष्ठ कामासाठी राज्यस्थरावरील15 लाखाचे व मराठवाडा स्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले. तरीही या सन्मानाने हुरळून न जाता विकासकामांना गती देण्याचे काम प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी चालु ठेवलेले आहे. स्वतःच्या संकल्पनेतून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज व स्मार्ट स्कूलची संकल्पना मांडून 58 गावांमध्ये तो उपक्रम यशस्वीपणे राबविला तसेच जिल्ह्यातील 56 अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचे कामही त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे.
त्याचबरोबर टंचाईमुक्त गाव, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, जलयुक्त शिवार, पर्यावरपूरक उपक्रम राबवून राज्यात पॅटर्न निर्माण केला. तसेच स्मार्ट स्कूलमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, सायन्स लॅब, प्लेग्राऊंड, ग्रंथालय, बायोमॅट्रिक हजेरी, सेमी इंग्लिश अशा विविध सुविधा राबविण्याचे काम त्यांनी केले. याबरोबरच लोकनेते स्व.विलासराव देशमुख यांचे राज्य व जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात रहावे,यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून भव्य असे स्मारक उभे करण्यातही त्यांनी योगदान दिलेले आहे.
जिल्ह्यातील टंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे त्यावेळची परिस्थिती लक्षात घेवून 1450 विहीर व बोअरचे अधिग्रहन करून मागेल त्या गावाला तात्काळ पाणी देण्याचे नियोजन त्यांनी केले. तसेच नरेगातून सहा हजार शेतकर्यांना विहीरीसाठी प्रत्येकी 3 लक्ष रूपये मिळवून देण्याचे काम केले. नरेगातून केलेल्या कामावर 750 कोटीचा खर्च त्यांनी केलेला आहे. याबरोबरच महिला व बालकल्याण विभागामार्फत मागेल तेथे अंगणवाडी मंजूर करून कार्यकर्ती व मदतनीसांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. तसेच दलीत व अल्पसंख्याकाच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रतिक्षा यादीनुसार हजारो नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले. याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्यासाठी जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये शिक्षण मिळवून देण्याचा संकल्पही त्यांनी संस्थेच्या सचिव म्हणून पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या,लातूरच्या संचालिका असल्यामुळे माणदेशी महिला फौंडेशन व महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मर्या,लातूर यांच्या समन्वयातून बचत गटातील महिलांना उद्योगी बनविण्याचे काम प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.अद्यापपर्यंत साडेचार हजार महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योगी बनविण्याचे काम केलेले आहे.
प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी पती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मदतीने समाजकारणातून राजकीय वाटचाल यशस्वीपणे सुरू केलेली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांची दोन्ही मुले अजितसिंह आणि रंजितसिंह हेही राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. ही राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून प्रतिभाताईंनी भूमिका सांभाळलेली आहे. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला असल्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आत्महत्या विरोधी निर्धार व टंचाई निवारण अभियान राबवून शेतकरी कुटुंबाना आधार देण्याचे कामही त्यांनी केलेले आहे तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना एक महिण्याचा पगार देवून सामाजिक उत्तरदायित्व सांभाळण्याचे कामही प्रतिभाताईंनी केलेले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबरोबरच लातूर शहरच्या लायनेस अध्यक्ष, लायनेस क्षेत्रीय संयोजिका, लायनेस कॅबीनेट ऑफीसर, कॅबीनेट सदस्या, मल्टिपल सदस्या, अशा विविध पदावर काम करून त्यांनी विविध घटकातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. या कामाची दखल ऑल इंडिया लिनेस क्लबने घेतली असून सध्या त्या ऑल इंडिया लिनेस क्लब एमएच-5 हिरकणीच्या प्रांतपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लिनेस क्लबचा पदभार घेतल्यापासून सात हजार सदस्यांच्या माध्यमातून गरजू महिलांना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या समाजकारणातून राजकारणाला दिशा देणारा आदर्श इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.