मरियम व उमेमा काझीचा पहिला 14 तासाचा कड़क रोजा...

 मरियम व उमेमा काझीचा पहिला रोजा...




औसा प्रतिनिधी : - औसा येथील खंदक - किल्ला रोड मधील केवळ ७ व ८ वर्षाच्या मरियम समीर उल हक्क काझी व उमेमा आवेज काझी यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवून आदर्श निर्माण केला आहे. 

इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, औसा येथील अवघ्या सात, आठ वर्षाच्या मुलींनी दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १४ तासांचा रोजा (उपवास) ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.

यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा व आज वरच्या तापमानात सर्वात जास्त तापमान असलेल्या एप्रिल महिन्यात आला आहे. हा रमजानचा महीना आणि त्यात रमजान महिन्याचे पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता हा रोजा (उपवास) ठेवला  जातो.

सध्याचे तापमान पाहता रखरखत्या उन्हात पाहटे ०४ : ४५ वाजेपासून सायंकाळी ०६ : ४५ वाजेपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एकही घोट न घेता दिवसभर उपाशी पोटी राहून त्यांनी अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत आहेत. या उष्णतेचा सर्व सामान्यांनाही त्रास सहन करावा लागत असताना या छोट्या मुलींनी आपली श्रद्धा व्यक्त करत आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा (उपवास)

मरियम समीर उल हक्क काझी व उमेमा आवेज काझी यांनी ठेवून पुर्ण करून आपल्या आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने रोजा (उपवास) ठेवला. यामुळे त्यांचे काझी बिरादार व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या