एम आय एमच्या वतीने औसा शहरात इप्तार पार्टीचे आयोजन
औसा प्रतिनिधी
औसा येथे रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये इफ्तार पार्टी हा एक विशिष्ट उद्देश ठेवून सर्व समाजातील नेते इतर पार्टीचे आयोजन करत आहेत. यातच एम आय एम पक्षाच्यावतीने औसा शहरातील मदरसा सिद्दीकी ए अकबर जलाल शाही चौक येथे सर्वधर्मीय बांधवासाठी एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन दिनांक 22 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी रमजानच्या 20 तारखे दिवशी इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील व तालुक्यातील सर्व पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते. यात प्रामुख्याने शिवसेनेचे शहराध्यक्ष सुरेश दादा भुरे, अजित दादा मुसांडे,राचट्टे, मौलाना अमजदसाब सिद्दिकी, मौलाना हारून इशाती, ॲड समियोद्दीन पटेल, डॉ.मुजाहीद शरीफ, डॉ.जीलानी पटेल, डॉ रफीक शेख, डॉ मनियार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अफसर शेख, इंजिनिअर मुबाशिर इनामदार,फकीर पाशा शेख,नय्युम पटवेकर,मुखीद सिद्दीकी,हारुणखाॅ पठाण,रुकमोद्दीन आळंदकर,सिराज शेख, दस्तगीर शेख, लातूर रिपोर्टर चे संपादक मजहर पटेल, पत्रकार एम बी मणियार, इलियास चौधरी,एस ए काझी,बळी पवार यांच्यासह आदि मान्यवर इप्तार पार्टीत सहभागी झाले होते. या इप्तार पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल एम आय एम औसा प्रमुख
सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.