औसा ते भादा रस्ता बनला मृत्यूचा सापळा सार्वजनिक बांधकामाच्या नाकर्तेपणाचे धिंडवडे
औसा प्रतिनिधी
औसा शहरातून भादा जाणारा रस्ता लातूर वेस हनुमान मंदिरापासून खादी कार्यालयापर्यंत अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून गुडघ्या एवढ्या खड्ड्यातून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर तसेच अवजड वाहने जीप टमटम कार बैलगाडी या सर्व वाहनांना या रस्त्यावरून जाणे अत्यंत कठीण बनले आहेत. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक व वाहनचालकामध्ये आता अत्यंत नाराजी पसरली आहे. महात्मा फुले नगरच्या बाजूने जाणारा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे .परिणामी या रस्त्यावर ऊसाचे ट्रक व ट्रॅक्टर फसत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लातूर वेस हनुमान मंदिरापासून खाली कार्यालयापर्यंत हा रस्ता सिमेंट काँक्रीट ने मजबूत करण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यावर नळाचे पाणी व नालीचे पाणी वाहत असून रस्त्यावर उन्हाळ्यात सुद्धा खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थातुरमातुर खड्डे बुजविण्याचे काम केले जाते व हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे धिंडवडे निघाले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.