श्री मुक्तेश्वर संगीत समारोहाची कथ्थक नृत्याने सांगता
औसा प्रतिनिधी
औसा शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री मुक्तेश्वर संगीत समारोहाचे भव्य आयोजन मंदिराच्या दर्शन मंडपात करण्यात आले होते तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या संगीत समारोहाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये पंडित वेदांग धाराशिव हे पंडित कृष्णा नवले यांचे गायन तसेच आकाश बडगे यांचे सोलो तबला वादन आणि अशोक पांचाळ यांचे सोलो हार्मोनियम वादन यासह शास्त्रीय गायन भजन व भावगीताची भरगच्च पर्वणी रसिक श्रोत्यांना मिळाली सुप्रसिद्ध कथ्थक नर्तिका श्वेता तंत्रे पाटील व त्यांच्या समूहाने अतिशय मनमोहक व रोमहर्षक कथक नृत्य सादर केले श्वेता तंत्रे पाटील यांच्या कथ्थक नृत्याने या संगीत समारोहाची सांगतात दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता झाली मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वाघदरे यांनी प्रास्ताविकातून सदर कार्यक्रमाची भूमिका विशद केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा युवराज हलकुडे यांनी केले कार्यक्रमासाठी औसा शहरातील शेकडो महिला व पुरुष रसिक उपस्थित होते कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.