माऊली संगीत विद्यालयाचा शुभारंभ
औसा प्रतिनिधी औसा येथील माऊली संगीत विद्यालयाचा शुभारंभ प्रसिद्ध संगीत विशारद शिवरुद्र स्वामी यांच्या शुभहस्ते व संगीतज्ञ गजेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला येथील हरंगुळ कर निवास येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सर्वश्री लक्ष्मण शिंदे महानंदा कोपरे सरोजनी कटारे हनुमंत लोकरे चैतन्य पांचाळ छाया जोशी उषा कठारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शिवरुद्र स्वामी म्हणाले की माऊली संगीत विद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रीय गायन तसेच तबला हार्मोनियम वादन इत्यादी चे शिक्षण दर्जेदार पणे देण्यात येणार असून या विद्यालयाच्या माध्यमातून संगीत आणि कला क्षेत्राची जोपासना करून भारतीय संस्कृती जतन करण्यासाठी मदत होणार आहे तरी संगीत प्रेमींनी माऊली संगीत विद्यालयाच्या माध्यमातून या क्षेत्राचे शिक्षण जास्तीत जास्त संख्येने घ्यावे असेही आवाहन शिवरुद्र स्वामी यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.