*हरंगुळ (बु.) येथील विकास नगर भागात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते भूमिपूजन.*
वर्षप्रतिपदा, गुढीपाडवा नववर्षाच्या शुभमुहूर्तावर दिनांक २ एप्रिल २०२२ वार शनिवार रोजी हरंगुळ (बु.) येथील कळंब रोड वरील विकास नगर भागात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बांधकामाचा भूमिपूजन समारंभ लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष व हरंगुळ चे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मांजरा साखर कारखान्याचे संचालक सूर्यकांत पाटील, निवृत्तीराव तीगीले, सुधीर पाटील, महेश वाघमारे, मंदिर बांधकामाचे शिल्पकार बिपिन राठोड, माळाकोळी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विकास नगर भागातील ग्रामस्थांच्यावतीने लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी सार्वजनिक विधायक कामे करत असताना पक्षीय अभिनिवेश सोडून सर्वांनी काम केले पाहिजे असे सांगितले. तसेच गावाचा विकास करण्यासाठी विधायक विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंतराव राठोड, कल्याण जाधव, धनराज बुलबुले, गोविंदराव गुडे, ईश्वर बुलबुले, दत्तात्रय परीट, बाबुराव पवार, परमेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर कोतवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव राठोड यांनी केले. कार्यक्रमास विकास नगर भागातील नागरिक तसेच महिला भगिनी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.