*निलंगाचे तहसीलदार जाधव वाळू माफियांना देतात अभय!*
*70 हजार दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी.*
निलंगा प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनबाबत अनेक गैरकारभार आहेत पदाचा दुरुपयोग करून अवैध वाळू माफियाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रारव्दारे मागणी केली आहे
निलंगा येथील इनाम जमीन सर्वे नंबर 291 स्टार फंक्शन हाॅल मध्ये अवैध वाळू साठा जप्त करून लिलाव दिनांक 24/0 6/2021 रोजी कागदोपत्री करण्यात आले लिलाव रक्कम 70470 रुपये आज पर्यंत रियाज महेमुद खान यांच्याकडून लिलाव रक्कम वसूल न करता त्या वाळू माफिया कडून आर्थिक देवाण-घेवाण करून व संगणमत करून तहसीलदार गणेश जाधव यांनी अवैध वाळू माफिया सोबत हात मिळवणी केल्याचे या प्रकरणा वरुन दिसून येत आहे.
दिलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांना जातीने लक्ष घालून दोषी निलंगा तहसीलदार गणेश जाधव व वसुली विभाग कारकून पाटणकर यांची चौकशी करून संदर्भीय पत्रा प्रमाणे त्या रकमेची वसुली करून बेजबाबदार तहसीलदार गणेश जाधव व संबंधित कर्मचारी जे की अवैध माफियांना पाठीशी घालत अल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा नावीलाजास्तव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.