एपीजे फाउंडेशन तर्फे बेघर वृद्ध आईवडिलांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

 एपीजे फाउंडेशन तर्फे बेघर वृद्ध आईवडिलांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

बेघर वृद्ध आईवडिलांनी घरवापसी साठी पोलिसांची मदत घ्यावी एपीजे फाऊंडेशनचे आवाहन



जागतिक मातृ दिनाच्या औचित्य साधून अवेअरनेस फॉर पीस ॲन्ड  जस्टीस फाऊंडेशन (एपीजे फाउंडेशन )च्यावतीने बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बेघर निवारा केंद्र कुमठा नाका येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

वृद्ध आई-वडिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि निराधार वृद्धांना त्यांच्या हक्क मिळवून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रम प्रसंगी एपीजे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मंगलगिरी म्हणाले आपल्या जन्मदात्या आई वडिलांना त्रास देणे ,त्यांना बेघर करणे ,मारहाण करणे ,मानसिक त्रास देणे हा दखलपात्र गुन्हा आहे .वृद्ध आई वडिलांचे योग्य पालन पोषण न केल्यास संबंधित मुलावर दंड किंवा शिक्षा किंवा दोन्ही तरतूद आहे

वयोवृद्ध आईवडिलांनी कोणत्याही प्रकारचा छळ अथवा अत्याचार होत असेल तर मदतीसाठी त्यांनी तात्काळ सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय येथे माता-पिता तक्रार निवारण केंद्राची संपर्क साधावा जेणेकरून आपल्या माता-पित्यांना सांभाळ न करणाऱ्या मुलांना चपराक बसविण्यात मदत होईल असेही ते म्हणाले

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव इरफान मंगलगिरी, इस्लामोउद्दीन शेख, वसीम शेख  (समुदाय संघटक Day- NULM विभाग सो.म.पा) यांनी आदि परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या