औसा तालुक्यातील तपसे चिंचोलीत तथागत गौतम बुध्द यांची२५६६व्या जयंती उत्साहात साजरी
औसा प्रतिनिधी
आज दिनांक १६मे २०२२रोजी देशभरात जगातील पहिले विज्ञान वादी संशोधक ,अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांची देश भरात जयंती साजरी करण्यात आली जयंती निमित्त अनेक ठिकानी विविध कार्यक्रमांनी बुद्ध जयंती साजरी करण्यात आली,यावेळी औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे ही तथागत गौतम बुध्द यांची जयंती साजरी करण्यात आली , सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व बौद्ध प्रेमी बांधवानी सार्वजनिक रित्या पंचशील , त्रिशरण, व अष्टगाथा ग्रहण करून बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाचे वाचन करण्यात आले, यावेळी बौद्ध जयंती निमित्ताने लातूर येथे रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते ,त्याठिकाणी जाऊन तपसे चिंचोली येथील रक्तदाते सचिन कांबळे यांनी रक्तदान केले, तपसे चिंचोली येथे तथागत गौतम बुध्द याच्या जयंतीला बौद्ध उपासक ,उपसिका बालक बालिका आदी गावातील जण समुदाय मोठ्या संख्येने हजार होता,
[जगात शांतता नांदवायची असेल तर आजच्या घडीला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. ] असे बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक वाचन झाल्या नंतर सांगण्यात आले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.