औसा शहरात उत्साहत ईद साजरी हजारो मुस्लिम बांधवाचे नमाज पठण

औसा शहरात उत्साहत ईद साजरी हजारो मुस्लिम बांधवाचे नमाज पठण


 










औसा मुख्तार मणियार

दोन वर्षां नंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.कोरोना निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यावर मर्यादा होत्या.ईद निमित्ताने औसा ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली.कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष या ठिकाणी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता आले नाहीत.यंदा मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झालेत.औसा शहरात एकच उत्साह दिसून आला.सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी जमा झाले होते.ईदगाह मैदानात ईद-उल -फित्रची नमाज औसा शहर काझी मिर मुजम्मील अली काझी यांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली.तसेच औशाचे शहर काझी मिर मुजम्मील अली काझी यांनी देशाचा विकास व्हावा देशांमध्ये सुख-समृध्दी व्हावी, सर्वांनी निरोगी व स्वास्थ्य लाभावे,देशात धार्मिक एकता राहावे व आध्यात्मिक शक्तीचा नायनाट व्हावा जनतेमध्ये बंधुभाव टिकून राहावा यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.प्रार्थने नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.तब्बल दोन वर्षांनंतर ईदगाह मैदानावर सामूहिक ईद नमाज पठण करण्यात आली.ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यु पवार,काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,औसा तहसीलदार भरत सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार,औसा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, अँड मुक्तेश्वर वागदरे, अँड अरविंद कुलकर्णी, सुधीर पोतदार आदि उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या