अकुंश गायकवाड या तरूणाच्या संशयास्पद मृत्यूची उच्चस्तरीय(सीआयडी)चौकशी करण्यात यावी: उत्तरेश्वर कांबळे
सोलापुर प्रतिनिधी:
कानेगाव ता.लोहारा येथे
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुद्धविहारातून काढावी. जयंतीच्या कार्यक्रमासाठी रीतसर परवानगी घ्यावी म्हणून अकुंश गायकवाड संबंधित लोहारा पोलीस ठाण्यात आवश्यक परवानगीसाठी गेला होता परंतू .ग्रामपंचायतीने त्याला नाहकरत दाखला सुध्दा दिला नाही..आणी कांही काळानंतर त्याचा मृतदेह बुद्धविहार परिसरातील एका झाडाला लटकलेला आढळून आला आहे.
जातीय अहंकारातून हा खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेस जबाबदार जातीयवादी गावगुंडांना अटक करा. अटक होत नाही तोपर्यंत, लटकलेले पार्थिव खाली उतरायचे नाही, अशी मागणी शोकसंतप्त आप्तेष्टांनी केली होती. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र यासाठी तब्बल चौदा तास कालावधी पोलिसांनी लावला. 14 तासानंतर आत्महत्येची नोंद करण्यात आली.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे कानेगाव'च्या सरपंचासह 10 जातीयवादी गावगुंडांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर शवविच्छेदन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच हा खून आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल.
कानेगाव हे सन 1993 च्या भूकंपानंतर पुनर्वसित गाव आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ समाजमंदिर आहे. संबंधित लोक त्याचा बुद्धविहार म्हणून उपयोग करीत. मात्र गावातील जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंडांमुळे सन 2017 पासून गावात तणाव आहे. प्रशासनाने या समाजमंदिराला (बुध्दविहाराला) कुलूपबंद केले आहे. गावात अन्य जातीधर्मांच्या लोकांचीही समाजमंदिरे आहेत. मात्र केवळ आंबेडकरी जनतेचे समाजमंदिर (बुद्धविहार) कुलूपबंद ठेवण्यात का ?आले आहे. असे का असा सवाल आंबेडकरवादी संघटनांनी प्रशासनाला विचारला आहे.
ज्या समाजमंदिराच्या परिसरात दुर्दैवी अकुंश गायकवाडचे पार्थिव झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, तिथून कांही फुटांच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवरच मागील कांही वर्षांपासून ही पोलिसचौकी इथे तळ ठोकून आहे.
तरीही ही आत्महत्या झालीच कशी? ड्युटीवरील पोलीस कर्मचारी नेमके काय करत होते? 'त्या' वेळी कोण पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उत्तर मात्र मिळत नाही. यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आंबेडकरी जनतेतून संशय व्यक्त केला जात आहे. संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी अकुंश गायकवाडच्या मृत्युची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.